रामकुंड पंचवटी येथे गणेश मूर्ती आणि निर्माल्य यांचे संकलन
β⇒ दिव्य भारत बीएस एम न्यूज : नाशिक : शुक्रवार : दि २९ सप्टेंबर २०२३
β⇒ महिरावनी नाशिक, ता . २८ ( प्रतिनिधी : डॉ. कमलेश दंडगव्हाळ ) :- संदिप फाउंडेशन फार्मसी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना , नाशिक महानगरपालिका, स्वप्नपूर्ती फौंडेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने रामकुंड पंचवटी येथे गणेश मूर्ती आणि निर्माल्य यांचे संकलन करण्यात आले. गणपती बाप्पाचे दहा दिवस मनोभावे सेवा केल्या नंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांना निरोप देण्यात येतो.
गणपती बाप्पाच्या मूर्तीचे नुकसान , विटंबना आणि पर्यावरणाची हानी होऊ नये ,हा या मागील मुख्य उद्देश होता. रासोयो स्वयंसेवक यांनी आलेल्या भाविकांचे समुपदेशन करून त्यांना गणेश मूर्ती दान करण्यास प्रोत्साहित केले व स्वच्छतेचे गांभीर्य लक्षात आणून गोदावरी नदीचे होणारे प्रदूषण आपण कसे रोखू शकतो, याचे महत्व अधोरेखित केले.
सदर मूर्ती आणि निर्माल्य संकलन उपक्रमात प्राचार्य डॉ. बोरसे व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. हेमंत चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थी प्रतिनिधी सोहंम पुरोहित, धनश्री गव्हाणे, ऋतुजा गवांदे, गौरव गचालें, ऋषी हिरे वैष्णवी देवरे, तेजस्वी शिंदे, संजना प्रियदर्शनी, श्रुती कापडणीस, गायत्री पवार, निकिता कदम, निखिल धोंगडे, मानसी पाटील, विनवी धामणे यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातर्फे पर्यावरण संवर्धनाची उपक्रमे नेहमीच राबविले जातात अशी माहिती प्राचार्य डॉ. बोरसे यांनी दिली.
β⇒ दिव्य भारत बीएस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ .भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०