





पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांच्या सेवापुर्ती निमित्त गुणगौरव सोहळा संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 01 मार्च 2024
β⇔ येडशी : दि,29(प्रतिनिधी : सुभान शेख ):-येडशी कळंब नगरवासीयांचे वतीने कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे हे नियत वयोमानाप्रमाणे 29 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले . त्यांच्या सेवापुर्तीनिमित्त गुणगौरव सोहळा वंचित बहूजन आघाडी जिल्हा नेते अनिल (बापू)हजारे,अमर चोंदे ऑफ व्हाॅईस मिडियाचे, लोजपाचे जिल्हा प्रमुख राजाभाऊ गायकवाड, वंचित बहूजन आघाडीचे नेते सनी मस्के व अनेक ज्येष्ठ मान्यवरांनी आयोजित केला.बलाई मंगल कार्यालय कळंब येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक सी.आर. घाडगे,महादेव महाराज अडसूळ, भास्कर भाऊ सोनवणे, विलास (बप्पा) करंजकर, विठ्ठल(मामा) समुद्रे, भाजपचे नेते आबासाहेब आडसूळ, शीलवंत बप्पा,ॲडव्होकेट मनगिरे साहेब उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक अनिल हजारे यांनी केले तर प्रास्ताविकेनंतर सामाजिक संघटना भारतीय बौद्ध महासभा, जोशाबा शिक्षक सहकारी पतसंस्था,बी.आर. आंबेडकर प्रतिष्ठान,ज्येष्ठ नागरिक महासंघ,धम्मदान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, ईपीएस ९५ सेवानिवृत्त कर्मचारी,कळंब तालुका नागरी संस्था, व्हाईस ऑफ मीडिया यांचे व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना माननीय सुरेश साबळे यांनी कळंब मधील वृक्षारोपण,अतिक्रमण, पारधी समाजातील तरुणांनी नोकरी करावी, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, गणेश मंडळे पैगंबर जयंती यांनी पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शिस्तबद्धपणे मिरवणुका व कार्यक्रम पार पाडल्याने कळंब मध्ये सर्व स्तरातून एकोपा असल्याची जाणीव झाली तर चोरीचा तपास व वेळोवेळी टाकलेल्या 77 धाडीतून काय-काय अनुभव आले. याबाबत मनोगत व्यक्त केले. कळंब मधील नोकरीचा एकूण प्रवास हा सर्व सुजाण नागरिकांच्या सहकार्याने ,पक्षभेद, जातीभेद,गरीब, श्रीमंत यांच्या पलीकडे जाऊन मला माझे काम करता आले. त्याबद्दल सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करून माझ्या कामामुळे,पदामुळे जर कोणाला माझ्याकडून अनाहूतपणे त्रास झाला असेल, भावना दुखावल्या असतील तर मी आपली दिलगिरी व्यक्त करतो असे नम्रपणे सांगितले. पोलीस स्टेशन चा प्रभारी हनुमंत कांबळे यांच्याकडे देण्यात आल्यामुळे त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बी.डी.शिंदे वनविभागाचे कळंब उपविभागीय अधिकारी दोडके श्रमिक मानवाधिकार आंदोलनाचे बजरंग ताटे,डि.के.कुलकर्णी,महादेव महाराज अडसूळ,ओबीसी समन्वयक जाधवर भडंगे काका, माधव सिंग राजपूत,भाजपचे नेते सतपाल बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल हौसलमल, वंचित बहूजन आघाडी कळंब नेते कुणाल मस्के, संभाजी ब्रिगेडचे नेते अतुल गायकवाड माजी नगरसेवक अमर अण्णा गायकवाड, माजी नगरसेवक सुनीलभाऊ गायकवाड,आर पी आय तालुका अध्यक्ष शिवाजी शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजित हौसलमल विनोद समुद्रे,अरुण गरड, बियाणी अक्षय हौसलमल डी.टी. वाघमारे, मिलिंद शिंदे, प्रतीक गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपक जाधव, निलेश पांचाळ, ओव्हाळ भैय्या, किशोर धावारे, सागर कांबळे, सनी हजारे, राहुल गाडे, रमेश कसबे, आप्पासाहेब हजारे, सायस हजारे , यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार प्रमुख लक्ष्मण धावारे यांनी तर आभार अनिल( बापू) हजारे यांनी मानले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. 8208180510