





डॉ. राम कुलकर्णी यांचे लेखनकार्य समाज प्रबोधनासाठी उपयुक्त– डॉ. सौ. दीप्ती देशपांडे

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि,30 जानेवारी 2024
β⇔नाशिकरोड, दि. 30 ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी स्वयंविकास साहित्यात केलेले लेखन कार्य समाजप्रबोधनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. साहित्य व लेखन क्षेत्रात त्यांचे योगदान खूप मोठे आहे, ” गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी व खजिनदार प्राचार्या डॉ. सौ दिप्ती देशपांडे यांनी काढले.
नाशिकरोड शिवाजीनगर येथील स्वयंविकास प्रबोधिनीच्या ग्रंथ प्रकाशन व स्व. डॉ. म. बा. कुलकर्णी स्मृति व्याख्यान कार्यक्रमात बोलताना त्यांनी प्रतिपादन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांच्या ‘ ऊर्जावान बना ‘ या ७६ व्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी स्व. डॉ. म. बा. कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ थोर विचारवंत डॉ. उल्हास रत्नपारखी यांचे ‘ प्रभू श्रीरामचंद्रांचे उर्जावान व्यक्तिमत्व ‘ या विषयावर व्याख्यान झाले. प्रभू श्रीरामचंद्र हे केवळ भारतीयांचेच नव्हे तर जगातील नागरिकांचे आदराचे स्थान बनले आहे असे त्यांनी याप्रसंगी सांगितले तसेच डॉ. म. बा. यांनी केलेल्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.
या कार्यक्रमात स्वयंविकास प्रबोधिनी तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना ऊर्जावान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यात ऊर्जावान उद्योजक-सोमनाथ राठी, ऊर्जावन कार्यकर्ता- बाळासाहेब पाठक, उर्जावन गायिका- सौ.नमिता राजहंस, ऊर्जावान सल्लागार -सौ. वैशाली सायंदे, ऊर्जावान कृषी कार्यकर्ता- रवींद्र अमृतकर, ऊर्जावान कृषीनेता पुरस्कार- रमेश औटे आदींना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. सतीश महाजन, सहलेखिका प्रा.प्रणाली पंडित, डॉ अनिल सावळे, आरोग्यचिंतनचे डॉ. विजय कुलकर्णी, सागर कुलकर्णी, प्रा. सौ. नीता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो 8208180510