श्रमजीवी संघटना जलजीवन मिशन विरोधात आक्रमक, चिकाडी ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 14 एप्रिल 2024
β⇔ सुरगाणा , दि.14 (प्रतिनिधी : एकनाथ शिंदे):-सुरगाणा तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत चिकाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत झालेली कामे व उंबरदे येथील जलजीवनची रखडलेली कामे पाणीपुरवठा अधिकारी, इंजिनियर कोणीच येऊन पाहणी केलेली नाही. त्यामुळे ठेकेदार त्यांच्या मर्जीप्रमाणे कामे करत असतात . चिकाडी येथील सर्व्हे झालेली विहीर खोदकाम करून व आडवे बोर लावूनही विहीरीला पाणी आले नाही. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन जलजीवनची दुसरी विहीर मंजूर करावी. अशी ग्रामस्थांची मागणी आहे. उंबरदे येथील अर्धवट झालेली पाईपलाईन कामे पुन्हा सुरु करावी आणि चिकाडी येथील वितरणाची लाईन जमिनीवर दिसत असल्याने महिलांनी उखडून टाकली आहे. वारंवार निवेदन देऊनही कर्मचारी उपस्थित नसल्याने मोर्चा स्थगित करण्यात आला. यावेळी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते चिकाडी, उंबरदे येथील महिला व पुरुष उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510