पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु. आर्यन वल्टे याचे घवघवीत यश
β⇒ दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : सायखेडा प्रतिनिधी : राजेंद्र कदम
β⇒ सायखेडा, ता . ६ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आर्यन श्रीकांत वल्टे याने 62 टक्के गुण मिळवून निफाड तालुक्यात सातवा तर नाशिक जिल्ह्यात 47 वा गुणवत्ता यादीत क्रमांक मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे .या विद्यार्थ्यांना मच्छिंद्र गोहाड ,संजय भोई , सविता घुले तेजस्विनी जाधव संगीता भारस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष डॉ. श्री सुनील ढिकले, उपाध्यक्ष श्री विश्वास मोरे ,सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे सभापती श्री बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती श्री देवराम मोगल, चिटणीस श्री दिलीप दळवी ,निफाड तालुका संचालक श्री शिवाजी गडाख, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष स्वामी कमलाकांताचार्य महाराज, शालेय समितीचे अध्यक्ष श्री विजय कारे, अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष श्री जगन्नाथ डेरले, मविप्रचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) डॉ. भास्कर ढोके शिक्षणाधिकारी तथा प्राचार्य डॉ. डी. डी. लोखंडे प्राचार्य श्री नवनाथ निकम, पर्यवेक्षक श्री दौलत शिंदे अॅड. श्रीकांत वल्टे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष जगन्नाथ आप्पा कुटे, नितीन गावले, सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी त्यांनी त्यांचे कौतुक केले.
β⇒ दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले, मो . ८२०८१८०५१०