





सिद्धी फौंडेशन संचालित ‘मोसमखोरे जलसंधारण समिती’ हरणबारी धरण व डोंगरावर १५००० वृक्षारोपण संकल्प

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि. 24 जून 2024
β⇔ ताहाराबाद(नाशिक), दि.24 (प्रतिनिधी : डॉ. प्रसाद सोनावणे) :- “मौसम खोरे जलसंवर्धन समिती “हरणबारी धरणातील गाळ काढण्याच्या अभियान अंतर्गत आलेल्या निधीतून व मान्यवरांनी दिलेल्या मदत निधीतून पहिल्या टप्प्यामध्ये किमान 15000 वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. सदर निधीतून फक्त धरणाच्या संपूर्ण किनाऱ्यावर व धरणाच्या बाजूला असलेल्या डोंगरावर बांबू लागवड करणार असून सरकारी नर्सरीतून फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मदतीने सर्व भारतीय प्रजातीची जंगली झाडे मुल्हेर येथील ना-र्या डोंगर, अंतापुर येथील दावल मलिक डोंगर, ताहाराबाद कॉलेज मागील डोंगर, सिद्धी इंटरनॅशनल अकॅडमी मागील तेल्या डोंगर व तहाराबाद- सटाणा रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करणार आहेत.

सदर वृक्षारोपण करण्यासाठी नुकताच उरलेल्या व मिळालेल्या आर्थिक मदत निधीतून रुपये सव्वा लाखाचा धनदेश श्री.सहाणे साहेब यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. वृक्षारोपण करण्यासाठी खड्डे खोदण्याच्या मोहिमेला सुरुवातही झाली. लवकरच नाशिक जिल्हा पालकमंत्री दादा भुसे, सटाणा आमदार दिलीप बोरसे, सचिन दादा सावंत व गाळ काढण्यासाठी दिलेल्या मदत निधीच्या दानशूर व्यक्तींच्या हस्ते सदर मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या मोहिमेबाबत बऱ्याच परिसरातील जनतेने साशंकता व्यक्त केली होती. परंतु सर्व तरुण या समितीमध्ये असल्याकारणाने सगळ्यांच्या अनमोल मदतीने गाळ काढण्याची ही मोहीम व वृक्ष लागवडीची ही मोहीम परिसरातील दानशूर व्यक्ती, रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण, मराठा सेवा संघ नाशिक जिल्हा यांच्या अनमोल मदतीने यशस्वी करू व जनतेचा पैसा हा राष्ट्राच्या व परिसराच्या हितासाठीच वापरू असे सर्व समितीच्या सदस्यांच्या वतीने डॉ. प्रसाद सोनवणे, संचालक मविप्र व जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ नाशिक ग्रामीण यांनी आश्वस्त केले आहे.

ताहाराबाद पंचकृशीतील दानशूरकडून मदतनीधी जाहीर :-
आमदार दिलीप बोरसे 2,00,000 /-
श्री सचिन दादा सावंत. पोकलँड
डॉ प्रसाद दादा सोनवणे.. १,११,००० /-
रावळगाव साखर कारखाना श्री गायकवाड साहेब चेअरमन व संचालक मंडळ रुपये रु.५१०००/-
श्री.अनिकेत सोनवणे ५००००/-
श्री दिपक कांकरिया ५१०००/-
डॉ प्रशांत सोनवणे २१०००/-
श्री पंकज भामरे २१०००/-
श्री. नेरकर साहेब,पत्रकार नामपुर ५०००/-
पोलीस पाटील संघटना, बागलाण ११०००/-
श्री ज्ञानेश्वर घरटे ५०००/-
श्री किरण ठाकरे ११००/-
——————————————————————————————————————-
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)
—————————————————————————————————————–