Breaking
आरोग्य व शिक्षणदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : येडशी (जि.धाराशिव ) :⇔ येडशीत लहान बालकांचा जीव धोक्यात ,अंगणवाडीसमोर घाणीचे साम्राज्य , ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष – ( प्रतिनिधी : सुभान शेख )

β : येडशी (जि.धाराशिव ) :⇔ येडशीत लहान बालकांचा जीव धोक्यात ,अंगणवाडीसमोर घाणीचे साम्राज्य , ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष- ( प्रतिनिधी : सुभान शेख )

0 1 2 3 6 5

येडशीत लहान बालकांचा जीव धोक्यात , अंगणवाडीसमोर घाणीचे साम्राज्य , ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

β : येडशी (जि.धाराशिव ) :⇔ येडशीत लहान बालकांचा जीव धोक्यात ,अंगणवाडीसमोर घाणीचे साम्राज्य , ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष - ( प्रतिनिधी : सुभान शेख )
β : येडशी (जि.धाराशिव ) :⇔ येडशीत लहान बालकांचा जीव धोक्यात ,अंगणवाडीसमोर घाणीचे साम्राज्य , ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष – ( प्रतिनिधी : सुभान शेख )

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि. 23 नोव्हेंबर 2023 

β⇔ येडशी (जि.धाराशिव ), ( प्रतिनिधी : सुभान शेख ) :- धाराशिव तालुक्यातील येडशी येथे  सुभाष नगर , बलवंड गल्लीतील लहान बालकांच्या अंगणवाडी क्रमांक १८ मधील लहान बालके शिक्षण घेण्यासाठी येत असतात. सदर अंगणवाडी समोर अनेक दिवसांपासून पहाटेच्या सुमारास व दिवसा काही महिला घरातील कचरा आणुन फेकत आहेत . कचऱ्यामुळे घाण पसरली असून दुर्गंधीमुळे डेंग्यू ,ताप ,सर्दी व अन्य रोगराई पसरत आहे.या डेंग्यू सदृश्य वातावरणामुळे लहान बालकांच्या जिवाला  धोका निर्माण  झाला आहे.

            येडशी  गावातील अंगणवाडी आशा सेविकाने सतत वारंवार ग्रामपंचायतीकडे विनंती अर्ज  करून देखील  अद्याप    ग्रामपंचायत  सरपंच, उप -सरपंच,  सदस्य   यांनी अंगणवाडीतील  लहान बालकांच्या  प्रश्नाकडे लक्ष  दिले नाही . सदर प्रश्नी नागरिकांनी  एखाद्या  बालकाच्या  संसर्गामुळे डेंग्यूची साथ  पसरली तर , या डेंग्यूला  सदृश्य  वातावरणामुळे रोगराई पसरल्यास   याला जबाबदार कोण राहणार ? असा प्रश्न उपस्थित नागरिकांनी केला आहे . येडशी ग्रामपंचायतीकडे कचऱ्याची घंटागाडी असतानाही गावातील महिला , नागरिकांनी जबाबदारीने कचरा  घंटागाडीत  टाकावा .त्यामुळे  स्वच्छात  राहील आणि रोगराई पसरणार नाही . गावातील वातावरण आरोग्यदायक, प्रसन्न राहील याची काळजी घ्यावी अशी आशा व्यक्त केली आहे. एखाद्या महिलेने किंवा नागरिकांने रस्त्यावर कचरा टाकले तर , दोनशे रुपयेचा दंड ठोठावला जाईल. असे ग्रामपंचायतकडून आवाहन केले  असतांना  ग्रामपंचायत कोणताही दंड आकारत  नसल्याने अस्वच्छता पसरत आहे .तरी ग्रामपंचायतीने लवकरात – लवकर अर्जाची  दखल घेऊन  कचरा टाकून अस्वच्छाता पसरवल्यास महिला किंवा नागरिकांना दंड बसविण्यात यावा.अशी मागणी अंगणवाडी आशा सेविका   गावातील नागरिकांनी केली आहे.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१० 

दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा
दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 3 6 5

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!