β : बोरगाव (सुरगाणा ) :⇔मोहपाडा आश्रमशाळाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश, व्हॉलीबॉल दोन संघाची राज्यपातळीवर निवड-( प्रतिनिधी : लक्ष्मण बागुल )
β : बोरगाव (सुरगाणा ) :⇔मोहपाडा आश्रमशाळाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश, व्हॉलीबॉल दोन संघाची राज्यपातळीवर निवड-( प्रतिनिधी : लक्ष्मण बागुल )
मोहपाडा आश्रमशाळाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश, व्हॉलीबॉल दोन संघाची राज्यपातळीवर निवड
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि. 6 जानेवारी 2024
β⇔बोरगाव, (सुरगाणा ) ता 6 ( प्रतिनिधी : लक्ष्मण बागुल ) :- आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य आयोजित नाशिक विभागस्तरीय नाशिक गरुडझेप अकादमी येथे २ ते ४ जानेवारी या कालावधीत पार पडल्या. यावेळी व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारात सुरगाणा तालुक्यातील मविप्र समाजाच्या मोहपाडा येथील आश्रमशाळेच्या एकूण २६ विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी झाली. नाशिक विभागस्तरीय यास्पर्धेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवणचे प्रतिनिधित्व मोहपाडा आश्रमशाळा या संघाने केले होते.यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक कैलास चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, उपायुक्त तुषार माळी, कळवण प्रकल्प अधिकारी विशाल नरवडे, शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर लोखंडे, शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक दीपक कणसे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक- ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरावर निवड झालेला संघ-
१४ वर्षे मुले व्हॉलीबॉल प्रथम क्रमांक – तुळशीराम गायकवाड, हेमंत गायकवाड, तुषार गवळी, खुशाल गवळी, प्रसाद गायकवाड, दुर्गेश चौधरी व इतर सहा विद्यार्थी
१७ वर्षे मुली व्हॉलीबॉल प्रथम क्रमांक – हर्षाली चव्हाण ,अंजली गवळी, अर्चना चौधरी, कामिनी जाधव, सोनी बागुल, रंजना गांगुर्डे व इतर सहा विद्यार्थिनी. १७ वर्षे मुले विभाग स्तरावर उपविजयी झाले आहेत, शाळेच्या एकूण २६ विद्यार्थ्यांची (१२ मुले व १४मुली) राज्यस्तरावर निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत .
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज:मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०