





“अंबाठा प्रबोधन विदयालयात रानभाजी मोहत्सव साजरा ! “
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : प्रतिनिधी : एकनाथ शिंदे
β⇒ सुरगाणा, ता.७ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) सुरगाणा तालुक्यातील प्रबोधन विदयालय अंबाठा येथे रविवारी रानभाजी मोहत्सव भरवण्यात आला होता.विद्यार्थीनी यामध्ये तेराभाजी, कवळीची भाजी, आळु, कुरडूची भाजी, माटाचीभाजी, वागाठा, कर्टूले , वास्ती, कडुकांद,चाइचे वेल, चवळवेल, सापडा, झारझुरा, मोखा, लोत ,चिकण्या, आळिंब,गोमाठा भोकरीचीभाजी, वऱ्यचीभाजी आदिसह अनेक रानभाज्याचे स्टॉल लावले होते. या रानभाज्या खाणे हे शरीराला आवश्यक आहे. नव्या पिडीला ते अवगत व्हावे. जुनी परंपरा टिकवली पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी शेलीन मॅडम, शिक्षक, पालक व विद्यार्थीनी यांनी सविस्तर माहिती दिली . यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षिका, पालक व विध्यार्थीनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले , मो . ८२०८१८०५१०