





जि.प. शाळा कठगड (ताहाराबाद) येथे ”जागतिक आदिवासी दिन” उत्साहात साजरा

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 9 ऑगस्ट 2024
β⇔ताहाराबाद (नाशिक), दि.9 (प्रतिनिधी : लीना महाले ):- कठगड (ताहाराबाद): जि.प. शाळा, कठगड येथे शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक श्री. गणेश महाले , शिक्षिका सुनिता भामरे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले.

यानंतर मुख्याध्यापक श्री. गणेश महाले यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी क्रांतिकारकांच्या जीवनावर माहिती देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने गाणे आणि नृत्यात सहभाग घेतला. “जय आदिवासी! जय निसर्ग देवता! जय मुळ निवाशी!” अशा जयघोषांसह सर्व उपस्थितांनी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आणि क्रांती दिनाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )