गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा सभागृहाचा उद्घाटन सोहळा
दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा :
नाशिक -२६ गुरुवार दि. २७ मे २०२३ रोजी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा सभागृहाचा उद्घाटन सोहळा सन्माननीय उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांचे प्रमुख सचिव मा. आनंद लिमये हे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि महासंचालक, सर डॉ. मो. स. गोसावी . या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मानव संसाधन संचालिका डॉ. सौ. दीप्ती देशपांडे सांभाळणार आहेत. गुरुदक्षिणा सभागृहाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दु. ४ वा. संपन्न होणार आहे. तसेच या प्रसंगी संस्थेच्या काही ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. संस्थेचे आधारस्तंभ असलेले देणगीदार विविध स्तरावर यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना याप्रसंगी गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या मानव संसाधन संचालिका डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांनी दिली.