





“कंचेश्र्वर (मांजरा) साखर कारखाना मंगरुळ प्रशासन, प्रहारच्या दणक्याने नरमले”

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 3 फेब्रुवारी 2024
β⇔येडशी(धाराशिव), दि.2( प्रतिनिधी : सुभान शेख ):- प्रहारच्या दणक्याने मांजरा प्रशासन नमले कंचेश्र्वर (मांजरा) साखर कारखाना मंगरुळ, ता. तुळजापुर,( जि. धाराशिव) हा कारखाना काही कारणाने तीन ते चार दिवस बंद होता. कारखाना परिसरात 300 च्यावर ऊस भरुन गाड्या थांबल्या होत्या आणि तेवढाच ऊस शेतक-याच्या फडात पडुन होता. ही बाब प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक जिल्हा प्रमुख मनोज जाधव यांच्या निदर्शनास आली.
प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक जिल्हा प्रमुख मनोज जाधव यांनी तात्काळ कारखाना प्रशासन जाब विचारला व शेतक-याचे जे नुकसान होत आहे. त्यांची नुकसान भरपाई म्हणुन त्या कालावधीत तोडलेल्या ऊसाला प्रती टन पाचशे रुपये जास्त भाव द्यावा. अन्यथा कारखान्याच्या चिमणीवर चढुन प्रहार स्टाईलने आंदोलन केल जाईल, असा ईशारा दिला. त्यानंतर दि 2/02/2024 रोजी कारखाना परिसरात आंदोलन सुरु केले. त्यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर यांनी हा विषय संचालक मंडळाला कळवुन 15 दिवसात निर्णय घेवु, असे लेखी उत्तर देऊन आंदोलन थांबवले.
याप्रसंगी आंदोलन स्थळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वर्षद तात्या शिंदे, माजी जिल्हा प्रमुख केदार सौदागर, युवक जिल्हाप्रमुख मनोज जाधव, लोहारा उमरगा उपाध्यक्ष दयानंद राठोड, धाराशिव तालुका प्रमुख प्रजय पवार, लोहारा तालुका प्रमुख किशोर भालेराव, परंडा तालुका उपाध्यक्ष बालाजी गंभिरे, नंदन थोरात ,बालाजी भालेराव, राम सुरवसे, लक्ष्मण सुरवसे व प्रहार सैनिक शेतकरी बांधव उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510