Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : त्र्यंबकेश्वर :⇔त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी अभियान व जाणीव -जागृती  विशेष उपक्रम संपन्न – ( प्रतिनिधी : शाश्वत महाले )

β : त्र्यंबकेश्वर :⇔त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी अभियान व जाणीव -जागृती  विशेष उपक्रम संपन्न - ( प्रतिनिधी : शाश्वत महाले )

0 1 2 9 1 1

     त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी अभियान जाणीव -जागृती  विशेष उपक्रम संपन्न

β : त्र्यंबकेश्वर :⇔त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी अभियान व जाणीव -जागृती  विशेष उपक्रम संपन्न - ( प्रतिनिधी : शाश्वत महाले )
β : त्र्यंबकेश्वर :⇔त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी अभियान व जाणीव -जागृती  विशेष उपक्रम संपन्न – ( प्रतिनिधी : शाश्वत महाले )
 β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिकरविवार , दि. 3  डिसेंबर 2023 
β⇔ त्र्यंबकेश्वर, ता.2 ( प्रतिनिधी : शाश्वत महाले ) :- आजच्या तरुणांनी अधिकार , कर्तव्याचे  पालन करून  नियम व कायद्या अभ्यास  करून समाजात जाणीव -जागृती करण्याची जबाबदारी तरुण पिढीवर आहे,” असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर तहसीलदार श्रीमती श्वेता संचेती यांनी केले. त्या त्र्यंबकेश्वर येथील मविप्र समाजाचे  कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी अभियान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप पवार हे होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार त्र्यंबकेश्वर , ठकाजीं महाले, नायब तहसीलदार सतीश निकम , राष्ट्रीय निवडणूक साक्षरता अभियान नवीन मतदार समन्वयक नाशिक जिल्हा श्री.अविनाश शिरसाट त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे राष्ट्रीय मतदार जागृती मतदार नोंदणी अभियानाचे नोडल ऑफिसर डॉ. भागवत महाले, महाविद्यालयीन नव मतदार अभियानाचे समन्वयक डॉ. सोनाली पाटील, डॉ.वैशाली जाधव, प्रा . राजश्री शिंदे , विद्यार्थी प्रतिनिधी विनोद मगर आदीसह पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
            त्यानंतर तहसीलदार श्वेता संचेती पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीबाबत मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी  जलज  शर्मा यांच्या आदेशानुसार १८ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतः  नवीन मतदार नोंदणी, जाणीव व जागृती करावी  आणि आपले   नातेवाईक गावातील जवळील मित्र,महाविद्यालयात नसणारे, शिक्षण प्रवाहात न आलेले यांना ही सांगून त्यांचीही मतदार नोंदणी करावी, असे आवाहन  केले. आज दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये विद्यार्थ्यांची नवीन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रथम वर्ष बी. ए.-१७५  बी. कॉम.-९४ आणि बी.एस्सी.-४४  या वर्गाच्या १८ वर्ष पूर्ण झालेल्या ३१३ विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी फॉर्म नंबर 6  वाटप करून मार्गदर्शन  करण्यात आले.
            त्यानंतर नाशिक जिल्हा राष्ट्रीय निवडणूक साक्षरता अभियान नवीन मतदार नोंदणी अभियान समन्वयक  श्री अविनाश शिरसाट मार्गदर्शन करताना म्हणाले की, भारतीय राज्यघटना ही जगात सर्वात मोठी लिखित स्वरूपात आहे, त्यामुळे मतदानाचा हक्क मिळाला आहे, म्हणून तीचे रक्षण करणे आणि पालन करणे नागरिक म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्र्यंबकेश्वर नायब तहसीलदार ठकाजी महाले यांनी 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव येण्यासाठी फॉर्म नंबर सहा भरून मतदान कार्ड प्राप्त करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे, हे सांगत मतदार नोंदणी फॉर्म नंबर ६ ,७, ८  कसे  भरायचे  आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार सतीश निकम यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की ,आज राजकीय क्षेत्रामध्ये तरुण पिढीची नितांत गरज निर्माण झाली आहे, देशाच्या प्रगतीसाठी युवा पिढीने नेतृत्व करणे काळाची गरज आहे.म्हणून त्यांनी जागृती करण्याची जबाबदारी स्वीकारावी .  
                     .
               कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनीं कायद्याचे ज्ञान आत्मसात करून समाजासाठी नेतृत्व करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय मतदान  हक्क  महत्त्व विद्यार्थीनी  समजून नागरिकांमध्ये जाणीव- जागृती मोहिम राबवली पाहिजे. एक आदर्श नागरिक म्हणून आपलं हक्काची जाणीव बरोबरच कर्तव्याचे पालन करणे आवश्यक आहे असे सांगितले, त्यांनी सर्व विद्यार्थ्याना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. नवीन मतदार नोंदणी  अभियान विविध उपक्रमांनी सप्ताहात राबिण्यात आला . 
        यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मतदार नोंदणी अभियानाचे नोडल अधिकारी  डॉ. भागवत महाले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्याना नवीन मतदार नोंदणी अभियान अंतर्गत फॉर्म नं ६ चे वाटप करण्यात आले. त्यांनतर दोन दिवसात फॉर्म कागदपत्रासह जमा करण्यात यावे असे सांगितले . यावेळी  कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ शरद कांबळे, प्रा.नीता पुणतांबेकर, प्रा समाधान गांगुर्डे, डॉ.संदीप माळी, प्रा प्रशांत रणसुरे, प्रा संदीप गोसावी, प्रा. शाश्वती निरभवणे, प्रा.ऋषिकेश गोतरणे, डॉ वर्षा जुन्नरे, डॉ. वैशाली जाधव , अशित्तोष खाडे , प्रा मनोहर जोपळे, विद्या जाधव, निखील सोनवणे , अनिल खेडकर , नीलेश म्हरसाळे, आदीसह बहुसंख्येने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.सूत्रसचालन डॉ सोनाली पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ भागवत महाले यांनी केले.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. ८२०८१८०५१० 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!