β : सिन्नर (नाशिक):⇔नाशिक लोकसभा निवडणूक रिंगणातून छगन भुजबळ यांची माघार-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : सिन्नर (नाशिक):⇔नाशिक लोकसभा निवडणूक रिंगणातून छगन भुजबळ यांची माघार-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
नाशिक लोकसभा निवडणूक रिंगणातून छगन भुजबळ यांची माघार
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्ववार : दि, 19 एप्रिल 2024
β⇔ सिन्नर (नाशिक), दि.19 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून छगन भुजबळ यांनी माघार घेतली असून त्यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन मी माघार घेत असल्याची घोषणा केली . त्यामुळे नाशिक मधून उमेदवारी विषयीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
भुजबळ यांनी नाशिकच्या जागे विषयी समीर भुजबळ यांच्यासाठी मागणी केली होती, मात्र अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हीच नाशिकची जागा लढवावी अशी इच्छा दर्शवली होती. गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर विश्वास दाखवून माझ्या नावाची शिफारस केल्याने मी त्यांचे धन्यवाद मानतो, माझे नाव चर्चेत आल्यामुळे सर्व समाजातील बंधू भगिनींनी मला सपोर्ट केला, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो, तसेच नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा प्रचार सुरू झालेला आहे. महायुतीचा मात्र अजूनही तिढा कायम होता, महायुतीकडून उशीर होत असल्यामुळे नुकसान ही होऊ शकतो. समोरच्याचा प्रचार जोरात सुरू असल्यामुळे ताबडतोब निर्णय घेणे गरजेचे होते. दरम्यान छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याने शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांचा मार्ग सुकर झाला आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510