





बिटको महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि 10 ऑक्टोबर 2024
β⇔नाशिकरोड ता.10 ( प्रतिनिधी : संजय परमसागर ):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित वाणिज्य मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी “करिअर मार्गदर्शन” या विषयावर प्रा. डॉ. करुणा कुशारे यांनी विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेतील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. करुणा कुशारे म्हणाल्या, “वाणिज्य शाखा व्यवसाय, व्यापार, अर्थ, कर्ज, वित्त यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित आहे. या शाखेत मार्केटिंग, कम्युनिकेशन, मॅनेजमेंट, बँकिंग, कॉस्टिंग, फायनान्स, ऑडिटिंग, अकाउंटन्सी, गुंतवणूक, विमा अशा अनेक क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांसाठी भरपूर संधी आहेत. बारावी नंतर बीबीए, आयसीएआय, मॅनेजमेंट स्टडीज, सीए अशा अनेक क्षेत्रांत करिअर करता येते. तसेच आयबीपीएसच्या बँकिंग परीक्षा, स्टेट बँक आणि आरबीआयसारख्या क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत. वाणिज्य शाखेत कॉस्टिंग किंवा लॉ यासारखे विषय निवडून उत्तम करिअर घडवता येते, आणि संवाद कौशल्य हे त्यासाठी अत्यावश्यक आहे.”उद्घाटन सोहळ्यात व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सुनीता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, प्रा. लता चिकोडे, संयोजिका शालिनी शेळके, अनुराधा वाघ, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उद्योजक कोहिनूर रतनजी टाटा यांना श्रद्धांजली वाहून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनीता नेमाडे यांनी केले, तर प्रणाली पाथरे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन शालिनी शेळके यांनी केले आणि आभार प्रदर्शन शुभांगी पाटील यांनी केले. तांत्रिक सहाय्य राहुल पाटील यांनी सांभाळले. कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )