β : साक्री :⇒ साक्री येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयतर्फे १५ ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाचे आयोजन – ( प्रतिनिधी : दीपक मोरे)
β : साक्री :⇒ साक्री येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयतर्फे १५ ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाचे आयोजन - ( प्रतिनिधी : दीपक मोरे)
साक्री येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयतर्फे १५ ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाचे आयोजन
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा :नाशिक : शुक्रवार : दि . १३ ऑक्टोबर २०२३
β⇒ साक्री , ता. १२ ( प्रतिनिधी : दीपक मोरे ) :- साक्री शहरातील आदर्श ग्राउंड येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तर्फे नवरात्र उत्सवानिमित्त नवरात्र घटस्थापनासह विविध कार्यक्रम सुरू होत आहे. १५ ऑक्टोबरपासून चैतन्य देवीचा झांकीचा कार्यक्रम, नवरात्रीच्या पहिल्या माळपासून प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व महाविद्यालयांतर्फे होणार आहे . १५ ते २४ ऑक्टोंबरपर्यंत कार्यक्रम होणार असून वेळ ७ ते १० असे ठेवण्यात आली आहे. सदर कार्यक्रम साक्री शहरात शिवाजी वाचनालयमागे आदर्श ग्राउंडवर नवरात्र उत्सवानिमित्त नऊ दिवस आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त कन्या नऊ देवीच्या वेशभूषा धारण करणार असून देवीचे विविध रूपाचे दर्शन बघायला मिळणार आहे. कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थिती लावणार आहेत . हा कार्यक्रम पुर्ण साक्री शहराचे लक्ष वेधणार असून धुळे जिल्ह्यात सर्वात मोठा कार्यक्रम ठरणार आहे. अशी माहिती प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व महाविद्यालय साक्रीचे प्रमुख शीला दीदी यांनी माहिती दिली.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०