





बिटको कनिष्ठ महाविद्यालयात संरक्षण क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन व्याख्यान संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि. 18 जून 2024
β⇔नाशिकरोड, दि.18 (प्रतिनिधी : संजय परमसागर ):“आपले आयुष्य यशस्वी होण्यासाठी आज कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतानांच विचार करण्याची योग्य वेळ असून सशस्त्र सेनेत करिअर करायचे असेल तर अभ्यासाबरोबरच खूप कष्ट व मेहनत घेण्याची क्षमता असायला हवी. त्यासाठी सुरुवातीपासूनच आपल्यात योग्यता, वैशिष्ट्ये व आवड असावी. संरक्षण दलातील करिअर म्हणजे जॉब नोकरी नसून सेवापरमोधर्म या तत्त्वाने देशासाठी अविरत सेवा आहे. अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात,”असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ऊर्जा करिअर अकॅडमीचे संचालक अनिरुद्ध तेलंग यांनी सांगितले.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात विद्यार्थी – विद्यार्थिनी मंच वतीने दि. १८ जुलै रोजी ‘संरक्षण क्षेत्रातील करिअर संधी’ या विषयावर ऊर्जा करिअर अकॅडमीचे संचालक अनिरुद्ध तेलंग व कर्नल अनिल बेदरकर यांचे मार्गदर्शन सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे यांनी करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय सौ. सारिका पाटील यांनी केला. कर्नल अनिल बेदरकर यांनी संरक्षण क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थापन, शांतता ऑपरेशन, नागरिक प्राधिकरण सहाय्यता, युद्धजन्य परिस्थितीत कार्य आदि जबाबदाऱ्यांबद्दल माहिती सांगून आर्मी,नेव्ही मधील ट्रेनिंग, इंडियन एअर फोर्स मधील विविध क्षेत्र त्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात. एनडीए -एनए, एसएसबी मुलाखत, मेडिकल परीक्षा आदिबाबत सविस्तर विवेचन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. हर्षदा तांदळे यांनी केले तर आभार शुभांगी पाटील यांनी मानले. कार्यक्रमास पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, राहुल पाटील, भूषण कोतकर, निलेश वाणी, मीना शिंदे यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)