Breaking
क्रिडा व मनोरंजनदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रसाहित्यिक

β : सुरगाणा β⇔वाघबारस सणाने वाघदेवाची पुजा करून आदिवासी दिवाळी सणाला प्रारंभ – ( प्रतिनिधी :रतन चौधरी )  

β : सुरगाणा β⇔वाघबारस सणाने वाघदेवाची पुजा करून आदिवासी दिवाळी सणाला प्रारंभ - ( प्रतिनिधी :रतन चौधरी )  

018491

वाघबारस सणाने वाघदेवाची पुजा करून आदिवासी दिवाळी सणाला प्रारंभ  

β : सुरगाणा β⇔वाघबारस सणाने वाघदेवाची पुजा करून आदिवासी दिवाळी सणाला प्रारंभ - ( प्रतिनिधी :रतन चौधरी )  
β : सुरगाणा β⇔वाघबारस सणाने वाघदेवाची पुजा करून आदिवासी दिवाळी सणाला प्रारंभ – ( प्रतिनिधी :रतन चौधरी )

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा  : नाशिक : बुधवार : दि. 8 नोव्हेंबर 2023     

β⇔ सुरगाणा, ता.8  ( प्रतिनिधी :रतन चौधरी ) :- निसर्ग हाच आदिवासी समाजाचा महान असा गुरु आहे.”आले निसर्गाचे मना…तेथे कोणाचे चालेना.या उक्तीप्रमाणे जल, जंगल, जमीन या देवतांची पूजा आदिवासी समाजातील कोकणा,कोकणी, भिल्ल, वारली, महादेव कोळी, ठाकूर, कातकरी आदींसह अनेक जमाती शेकडो वर्षांपासून निसर्गातील देव देवतांची पूजा अर्चा करीत आहेत. त्यापैकीच एक वाघ बारस सणाची पूजा केली जाते यामध्ये वाघदेव, नागदेव, चंद्र, सूर्य, मोर, विंचू, झाडे यांची पूजा वाघबारस या दिवशी केली जाते. दिवाळी म्हटली की गोडधोड पदार्थ, नवीन कपड्यांची खरेदी, फटाक्यांची आतषबाजी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज असा हा आंदोत्सवाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

               शहरी भागात दिवाळी म्हटले की फटाक्यांची आतषबाजी, घरासमोर लावलेले आकाश कंदील, दिवाळी पहाटचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असतो.मात्र आदिवासी बांधव हे आपले सर्व सण निसर्गावर आधारित साजरे करत असतात. दिवाळी सणसुद्धा निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्ग देवतेची आराधना, आळवणी करीत निसर्गातील वाघ देवाला प्रसन्न करण्यासाठी निसर्गाला कोणतीही हानी न पोहचवता उत्सव साजरे करत असतात. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी या दिवशी प्रत्येकाचे घर शेणा-मातीने सारवून काढले जात असे. आजही आदिवासी दुर्गम भागात अनोख्या त-हेने निसर्गाचे नियम पाळत सण साजरे केले जातात. घरातील सर्व सदस्य घर सजवण्यासाठी कंबर कसत असतात. दाराजवळ आंब्याच्या पानांच्या व मोखवल्याच्या( मखमली) झेंडूच्या फुलांच्या माळा बांधल्या जातात. सर्व घर, दारावरची चौकट चिखलाने लिपून त्यामध्ये फुले खोचून मखमलीच्या फुलांनी सजवले जाते. या दिवाळीचे वैशिष्टय़ असे की फटाक्यांची आतषबाजी केली जात नाही. शेण-मातीने सारवलेल्या घरांच्या भिंती सजवून घराच्या ओट्यावर दिवे लावत घर उजळवण्याची परंपरा आहे. या घरांना पणत्या किंवा कंदील लावलेले नसतात.निसर्गाचे पूजन करणाऱ्या आदिवासींच्या पाडय़ावर आजही तांत्रिकपणा नाकारून निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता दिवाळीसण साजरा केला जातो. आकाशकंदील लावले जात नाहीत. तर ओट्यावर कडू चिबडाचे(रान काकडी) दोन समान भाग कापून तयार केलेल्या दिव्यात तेल ओतून दिवे लावले जातात.आदिवासी बांधव इतर समाजापेक्षा वेगळय़ा पद्धतीने साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाला ‘गाव दिवाळी’ देव दिवाळी, काचकी दिवाळी असे महिनाभर हा उत्सव साजरा करतात.आदिवासी समाजामध्ये मध्ये तर वाघबारस, धनतेरस,चवदस आणि पूनम अशी चार दिवस चालणारी दिवाळी मोठय़ा उत्साहात साजरी केली जाते.मात्र आदिवासी बांधवही हा सण अतिशय वेगळ्या पांरपारीक पद्धतीने साजरा करतात.पूर्वी आदिवासी समाज मुख्यतः शिकार आणि गुरे पालन करणे हे व्यवसाय करीत असत यात जंगल आणि जंगली प्राणी हे नात अगदी अनादी कालापासून
                            पूर्वीपासून चालत आलेलं आहे.म्हणून वाघासारख्या हिंस्त्र श्वापदापासून गाईगुरांचे संरक्षण व्हावे म्हणून आदिवासी ग्रामीण भागात वाघबारस साजरी करण्याची प्रथा आहे.वसूबारसेच्या म्हणजे आदिवासींच्या वाघबारशीच्या दिवशी गुरे चारणारे गुराखी (बाळदी)नेहमीप्रमाणे गायी चारण्यासाठी जंगलात जातात. या दिवशी सर्व गुराखी उपवास करतात.आदिवासी बांधवांनी वाघाला देव मानले आहे. म्हणूनच काही भागांत वाघोबाची मंदिरे पाहावयास मिळतात. तसेच गावाच्या सीमेवर दगडावरील किंवा सागवानी लाकडावर वाघदेव, नागदेव, चंद्र, सूर्य, मोर, विंचू या निसर्गातील प्रतीकांची कोरीव नक्षीकाम केलेली प्रतिके आपल्याला गाववेशीवर, गावदेवी जवळ दिसतात.अनेक ग्रामदैवतांच्या मंदिराच्या बाहेर वाघांच्या मूर्ती आहेत.वाघ देवतेचे मंदिर हे गावाच्या वेशीवर असते. मंदीरात दगडी चिऱ्यावर काही ठिकाणी वाघबरसच्या दिवशी वाघ मंदीराच्या ठिकाणी गावातील प्रमुख मंडळी, भगत, निसर्ग पूजारी मुले, मुली नवीन कपडे घालून एकत्र येतात. यावेळी गाईचे शेण, गोमूत्राने वाघोबाच्या मंदिराचा संपूर्ण परिसर शिंपडून जीव जंतू मुक्त करतात. त्यानंतर आदिवासी भगत रुढी पंरपरेनूसार वाघदेव, नागदेव, सुर्यदेव, चंद्रदेव, धरतीमाता जंगलाची, निसर्गाची पुजा करतात. पुजेवेळी देवताच्या मुर्तीला शेंदुर लावून दुध व पाण्याने आंघोळ घालतात. पुजेत तांदुळ, नागली, पाचखाद्य, अगरबत्ती दिवा लावून पुजन केले जाते. पुजाविधी झाल्यानंतर ग्रामस्थ नारळ, गोड पदार्थाचा नैवद्य दाखवितात. पेठ दिंडोरी, कळवण, सुरगाणा,साक्री,पिंपळनेर,नंदुरबार, सटाणा, इगतपूरी तालुक्यातील बहुतेक भागात वाघदेवतेला कोंबडाचा नैवद्या दाखवला (बाटवला) जातो. मोह फुलाची दारुची शाक पाडत नैवेद्य दाखवला जातो.या सणाच्या आधी एक महिना आदिवासींचे सारे देव रानात पारध( शिकार) करण्यासाठी गेलेले असतात. ते वाघबारसेला घरी येतात. त्यामुळे या दिवसाला आदिवासी जीवनात एक वेगळे महत्त्व आहे. वाघबारसच्या निमित्ताने आदिवासी शेतकाम बंद ठेवतात.

                वाघबारसला प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व तिखट नैवद्यासाठी वर्गणी गोळा केली जाते. संध्याकाळी गावातील सर्व गुरे, पाळीव प्राणी वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणून पुजन केले जाते. यानंतर गावातून गुराखी गाणे गात , ढोल बडवत गुरांची मिरवणूक काढली जाते. नेहमीच्या गाय दांडावर चौरस मीटर जमीन शेणाने सारवून त्या जागेवर साग व सावरीचे दोन सोटे( फांद्या) उभ्या करुन अंबाडीच्या दोरीने तोरण बांधून सारवलेल्या जमीनीवर तांदळाच्या पुंजळ्या ( पुंजके) निसर्गाच्या देवांच्या नावे पाडतात. शेंदूर, गुलाल टाकून पूजा करतात. त्या जागेवर अंडे किंवा कोंबडीचे जीवंत पिलू ठेवले जाते. पूजा झाल्यावर ते पिल्लू रानात सोडून दिले जाते. गुरा वासरांना ढोल ताशा,फटाके वाजवून भडकवले जाते. नंतर गवत जागेवर पेटवून पेटलेल्या ज्वाळांमधून गुराखी (बाळदी) उडी मारून सुरक्षित बाहेर पडतो. एक प्रकारे अग्निदिव्यातून संकटातून बाहेर पडण्याचे प्रशिक्षणच गुराख्याला दिले जाते.यावेळी गाणी गायली जातात. यामध्ये पशू, पक्षी, प्राणी, झाडे याचे गुणगान करीत वर्णन केले जाते.

                   आली धिन धीन दिवाळी हो…आली धिण धिन दिवाळी… गाई म्हशीला ओवाळी हो…बहीन भावाला ओवाळी.. आली वर्षाची धींडवाळी… या सारे गीत गावून आदिवासी बांधव मनोभावे पुजा करतात. धनधान्य पिकू दे, सर्वांना सुखी ठेव, गुराढोरांना सुखी ठेव अशी मनोभावे प्रार्थना करीत वाघबारस मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दिवाळी सण त्या त्या भागानुसार थोड्याफार फरकाने साजरी केली. गावातील आदिवासी बांधव शक्यतो निसर्गदेवतांची पांरपारीक पुजा करतात.अलीकडे शहरी भागातील संपर्क आल्यामुळे इतर समाजातील काही प्रथा, परंपरा, प्रभाव समावेश करून देखील साजरी होताना दिसत आहे. यामध्ये सुशिक्षित नोकरदार यांचेकडूनच पारंपरिक आदीम संस्कृतीचे दर्शन व संवर्धन न होता आधुनिक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. शिकलेल्या, सुसंस्कृत आदिवासी समाजाकडून संस्कृतीचे जतन व संवर्धन केले जात नाही. असा आरोप काही संस्कृतीचे अभ्यासक यांचेकडून केला जात आहे.यामध्ये गावातील एखादी व्यक्ती रानवा देवाचा भक्त असतो.वर्षातून एकदा म्हणजे या दिवशी त्याच्या अंगात येत असते.त्यालाच देव, वारा येणे असे म्हणतात.आदल्या दिवसापासून अंगात आले असल्याने संपूर्ण रात्र जागरण करून निसर्गदेवाची पुजा केली जाते.

                    सकाळी लवकर उठून कंबरेवर धज (ध्वज) घेऊन गावदेव गावाजवळील स्थानकाकडे प्रस्थान करतो.त्यासोबत त्याची काळजी घेणारी गावकरी मंडळी देखील असते.नाचत नाचत नदीकडे जात असताना सोबत एक बोकड ,एक मेंढा,कोंबडे वगैरे देखील घेऊन जात असतात.नदीजवळ म्हणजे देव स्थानकाजवळ गेल्यावर भगत तेथील देवस्थानाला नारळ वगैरे चढवतो त्याच क्षणाला सर्व जित्रब म्हणजे (बकरे, कोंबडे वगैरे) बळी दिले जातात यात कोणताही विलंब केला जात नाही. नित्य नियमाने निसर्गाची पूजा केली जाते. असा रितीने निसर्ग हाच गुरुस्थानी मानत निसर्गातील जल, जंगल,जमीन,अग्नी,वायू,तेज या देवतांची पूजा अर्चा करीत ख-या अर्थाने निसर्गाचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच आदिवासी बांधव वर्षानुवर्षे हा सण उत्साहाने साजरा करीत आहेत.

माहिती संकलितरतन चौधरी ( डांगी भाषिक ) पिंपळसोंड, ता.सुरगाणा (नाशिक) महाराष्ट्र

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!