Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगराजकिय

β : छत्रपती संभाजी नगर :⇒ वैजापूरजवळ ट्रॅव्हल्स बस भरधाव वेगाने ट्रकला धडकून भीषण अपघात 12 जणांचा मृत्यू ,नाशिक शहरावर शोककळा 

β : छत्रपती संभाजी नगर :⇒ वैजापूरजवळ ट्रॅव्हल्स बस भरधाव वेगाने ट्रकला धडकून भीषण अपघात12 जणांचा मृत्यू ,नाशिक शहरावर शोककळा 

0 1 2 9 1 1

वैजापूरजवळ  ट्रॅव्हल्स बस  भरधाव वेगाने  ट्रकला धडकून  भीषण अपघात 12  जणांचा मृत्यू ,  नाशिक शहरावर शोककळा 

β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि 15 ऑक्टोबर 2023

β⇒छत्रपती संभाजी नगर , ता.15 ( प्रतिनिधी : खास ) :- बुलढाणा येथील सैलानी बाबाचे दर्शन करून नाशिककडे परतत असणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचा ट्रकला धडकून  भीषण अपघात झाला. सदर  दुर्घटना वैजापूर जवळ समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोल नाक्यावर भरधाव वेगाने  ट्रॅव्हल्स बसने  उभे असलेल्या ट्रकला जोराची धडक दिली . या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पाच वर्षाच्या मुलीचा देखील समावेश आहे, अपघातात 23 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर वैजापूर आणि छत्रपती संभाजी नगर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 

                              सदर अपघातातील सर्व प्रवासी नाशिक  जिल्ह्यातील  नाशिक रोड, इंदिरा नगर, येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  नाशिक येथील काही भाविक बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबाच्या दर्गा येथे दर्शनासाठी खाजगी ट्रॅव्हल्स बसने  गेले होते. खाजगी बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. सर्व प्रवासी बुलढाण्याकडून नाशिककडे  दर्शन घेवून परत येत असताना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ‘नागपूर- मुंबई ‘ समृद्धी महामार्ग वैजापूरजवळ जांबरगाव शिवारात असलेल्या टोल नाक्यावर ही घटना घडली आहे.  प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकला तपासणी करण्यासाठी थांबवले होते. ट्रक चालक वाहन बाजूला घेत असताना पाठीमागून येणारी ट्रॅव्हल्स बस ट्रकवर भरधाव वेगाने धडकली.  हा अपघात एवढा भीषण होता, की ट्रॅव्हल्स बसच्या समोरच्या भागाचा अक्षरशा चक्क्काचुर झालाआहे. या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच वर्षाच्या चिमुकलीचा देखील समावेश आहे. 

                        दरम्यान घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळावरून जखमी रुग्णांना तात्काळ स्थानिक रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  घटनेची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालय सज्ज करण्यात आले असून घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सदर घटनेचे वृत्त समजताच  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.  त्यांनी या घटनेतील मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून दोन लाख तर जखमींना 50 हजार रुपयाची मदत देण्यात येणार असल्याचे  सांगितले आहे. अपघाताच्या वृत्ताने अतिशय दुःख झाले असे मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो,  जखमींना लवकरात लवकर बरेच होण्यासाठी प्रार्थना करतो. अशी प्राथना केली आहे .  प्रशासनाने घटना स्थळी धाव घेतली असून मदत व बचाव कार्य सुरू असल्याचे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. जखमींवर शासकीय खर्जाने योग्य ते उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.  सदर घटनेविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असून अपघात नेमका कशामुळे झाला. त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ट्विट करत मृतांना श्रद्धांजली वाहिले असून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले असून जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत.

                      मृतांची नावे तनुश्री लखन सोळसे ( वय 5 रा. समता नगर, नाशिक),  संगीता विलास आठवले  ( वय 42 रा. वनसगाव निफाड, नाशिक) , अंजनाबाई रमेश जगताप (वय 38 ,रा. राजूनगर, नाशिक) , रतन जमदाडे (वय 45 रा. संत कबीर नगर, नाशिक) काजल लखन सोळसे  (वय 32 रा. समता नगर, नाशिक) रजनी गौतम तपासी (वय 32 ,रा. गवळणी नाशिक) हौसाबाई आनंदा शिरसाट (वय 30 भुगाव निफाड, नाशिक ) झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय 50 रा. राजू नगर ,नाशिक),  अमोल झुंबर गांगुर्डे (वय 18 रा. राजू नगर नाशिक) ,  सारिका झुंबर गांगुर्डे (वय 40 रा. राजू नगर, नाशिक ),  मिलिंद हिरामण पळगारी (वय 50 रा. कोकणगाव , निफाड, नाशिक)  दीपक प्रभाकर केकानी ( वय 47 रा पिंपळगाव बसवंत, नाशिक)  जखमींची नावे पूजा संदीप अस्वले (वय 35 रा. गांधीनगर, नाशिक) वैष्णवी संदीप अस्वले (वय 12 रा. गांधीनगर, नाशिक) ज्योती दीपक केकाने ( वय 35 रा पिंपळगाव बसवंत ,नाशिक) , कमलेश दगू म्हस्के (व 32 रा. राहुल नगर, नाशिक), रघुनाथ अस्वले (,नाशिक रोड) युवराज विलास साबळे (वय 18 इंदिरानगर, नाशिक) ,  कमलाबाई छबू मस्के ( वय 77 रा. ममदापूर, नाशिक)  संगीता दगडू म्हस्के (वय 60 रा. गांधीनगर ,नाशिक) दगू सुखदेव मस्के (वय 50 रा. गांधीनगर, नाशिक) लखन शंकर सोळसे (वय 28 ,समता नगर ,नाशिक) , गिरजेश्वरी संदीप अस्वले (वैदः रा. नाशिक ), शांताबाई नामदेव म्हस्के (वय 40 रा. गांधीनगर ,नासिक), अनिल लहानू साबळे (वय 32, रा. गांधीनगर, नाशिक), तन्मय लक्ष्मण कांबळे ( वय 8, रा. पिंपळगाव बसवंत,नाशिक)  सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन ( वय 25 रा. वैजापूर ) श्रीहरी दीपक केकाने (वय 12 रा. पिंपळगाव बसवंत, नाशिक), सम्राट दीपक केकाने (वय-6, रा. पिंपळगाव बसवंत, नाशिक)  गौतम भास्कर तपासे ( वय- 38 रा. गवळणी , नाशिक),  कार्तिक लखन सोळसे (वय 5 रा. समता नगर, नाशिक ) , धनश्री लखन सोळसे (वय 8  रा. समता नगर ,नाशिक)  प्रकाश हरी गांगुर्डे( वय 24 रा. त्रंबकेश्वर,नाशिक) ,  शंकर ( वय-3 ) यांचा समावेश आहे. सदर घटनेन नाशिक शहरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त  होत  आहे . 

β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले  : मो .८२०८१८०५१० 

दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा
दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!