





शिक्षक परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन,शिक्षकांचे प्रलंबित प्रश्नांवर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन
β : दिंडोरी:⇔शिक्षक परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन,शिक्षकांचे प्रलंबित प्रश्नांवर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन-(प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 3 सप्टेंबर 2024
β⇔ दिंडोरी, दि.3 (प्रतिनिधी : रावसाहेब जाधव):- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा शाखा नाशिकच्या वतीने शिक्षकांच्या प्रश्नांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी, मुख्यनिवडणूक अधिकारी जिल्हा नाशिक यांना राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय बबनराव पगार यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाध्यक्ष वासुदेव बोरसे, कार्यवाह राजेंद्र खैरनार यांच्या विचारविनिमयाने पदाधिकारी जिल्हानेते रमेश गोहिल, उपाध्यक्ष दीपक खैरनार, कार्याध्यक्ष जितेंद्र खोर, जिल्हा प्रतिनिधी रावसाहेब जाधव, वैभव उपासनी आदींच्या उपस्थितीत खालील विषयांवर निवेदन देऊन चर्चा व पाठपुरावा करण्यात आला. खालील मुद्दावर निवेदन देवून चर्चा करण्यात आली.
१) जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्या त्वरित करणे बाबत
२) MDM -प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत निश्चित केलेली नवीन पाककृती अतिशय क्लिष्ट असून शिक्षकांना त्रासदायक ठरत असल्याबाबत
३) निवड श्रेणी टप्पा दोन प्रस्ताव त्वरित निकाली काढणे बाबत
४)BLOबाबत- मुख्य निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी साहेब नाशिक
नाशिक यांना जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना बीएलओ कामातून कार्यमुक्त करणेबाबत संदर्भ-23 ऑगस्ट 2024 चा शासन निर्णय सोबत देऊन कार्यवाही व्हावी असे सांगितले.
५) शिक्षकांची पुढील प्रलंबित प्रश्नां बाबत-निवड श्रेणी टप्पा दोन त्वरित मंजूर करावी,वरिष्ठ वेतन श्रेणी चटोपद्याय प्रस्ताव मंजूर करणे, विज्ञान व भाषा पदवीधर पदोन्नती व रिव्हर्शन बाबत,पेसा क्षेत्रातील शिक्षकांना एकस्तर लागू करणेबाबत,प्रलंबित फरकबिले, मेडिकल बिले, 39ब बिले त्वरित निकाली काढण्यात यावीत म्हणून वरील विषयांवर निवेदन देऊन चर्चा करून पाठपुरावा करण्यात आला. निवेदन दिल्यानंतर शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की प्रलंबित प्रश्नांवर कार्यवाही न झाल्यास शिक्षक परिषद जिल्हा स्तरावर तीव्र आंदोलन करणार येणार आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)