





स्वस्त धान्य लाभार्थींना ई-केवायसी अनिवार्य ;केवळ 40% कार्डधारक, राशन वितरणावर परिणाम

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 25 जून 2024
β⇔नाशिक, दि.25 (प्रतिनिधी :सुरेश इंगळे ):- रेशन वितरणातील अनियमिततेच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभाग सतर्क झाल्याचे दिसून आले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीनुसार स्वस्त मोफत धान्याचा लाभ घेत असलेल्या लाभार्थींना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 40% कार्डधारकांनीच केवायसी केलेली असल्याचे निदर्शनास आले. अन्नसुरक्षा योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सर्व योजनेतील रेशन कार्डधारकांनी प्रत्येक ई – केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात 2000 रेशन दुकानदारापैकी अनेकांनी केवायसी होत नसल्याची तक्रार केली आहे. अनेकांचे आधार कार्ड रेशन कार्डला लिंक नसल्याने त्यांची ही समस्या येत आहे. बऱ्याच ठिकाणी रेंज नसल्याने केवायसीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष निवृत्त कापसे यांनी दिली आहे. ज्या लाभार्थीने अजून केवायसी केलेली नसेल त्यांनी आपल्या रेशन दुकानदाराकडे जाऊन किंवा तहसीलमध्ये संपर्क साधून आधार कार्ड सोबत घेऊ ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)