त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी !
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : दि. २ ऑक्टोबर २०२३
β⇒ त्र्यंबकेश्वर, ता.2 (प्रतिनिधी : समाधान गांगुर्डे ):- त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळा अंतर्गत, राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पुंडलिक पवार यांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांना स्वच्छतेची शपथ दिली.
त्यानंतर त्यांनी आपल्या मनोगतात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन व त्यांनी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक यांनी महाविद्यालयातील सर्व परिसर ‘स्वच्छता हीच सेवा’ या कार्यक्रमांतर्गत परिसर स्वच्छ करून घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आशुतोष खाडे यांनी केले व आयोजन विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा. मनोहर जोपळे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शरद कांबळे, डॉ. अजित नगरकर, प्रा. समाधान गांगुर्डे, डॉ. संदीप निकम, प्रा. श्रीमती निता पुणतांबेकर, प्रा. उत्तम सांगळे,प्रा.संदीप गोसावी , प्रा.प्रशांत रणसुरे , डॉ . भागवत महाले, डॉ. मनीषा पाटील, प्रा. ऋषिकेश गोतरणे, प्रा. निलेश मरसाळे, प्रा. श्रीमती राजश्री शिंदे, प्रा.श्रीमती.अर्चना धारराव , डॉ.जयश्री शिंदे, प्रा.प्रणील जगदाळे, प्रा.संकेत भोर, डॉ.पोपट बिरारी, प्रा.श्रीमती शाश्वती निरभवणे, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी , ज्युनिअर विभागातील शिक्षक- शिक्षिका व विदयार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ.भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०