0
1
2
9
1
1
सुनंदाताई गोसावी कलादालनामध्ये निसर्गचित्रणाचे प्रात्यक्षिक
⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार , दि. 21, ऑगस्ट 2023
⇒ नाशिक , ता . 21 : दिव्य भारत बी एस एम न्यूज : ⇒ :- 21 ऑगस्ट सोमवारी या कलादालनाचे उद्घाटन झाले. हे चित्र प्रदर्शन 21 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या दरम्यान सकाळी साडेदहा ते सातपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. यादरम्यान विविध प्रात्यक्षिक परिसंवाद कार्यशाळा यांचे आयोजन केले आहे. 22 ऑगस्ट मंगळवारी चित्रकार श्री अशोक देवरे यांच्या निसर्ग चित्र प्रात्यक्षिकांनी शुभारंभ झाला. जल रंगाचे प्रमुख वैशिष्ट्य असणारा त्याचा तजेलदार पणा व प्रवाहीपणा याचा प्रत्यय त्यांच्या निसर्गचित्रणातून दिसून आला. मन ताजे करणारे निसर्गचित्रणाचा आनंद सर्वांना मिळाला या प्रात्यक्षिका दरम्यान त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला कलेचे शिक्षण घेण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात राहणे, निरीक्षण वाढवणे, हे आवश्यक आहे. निसर्गातील अगणित रंगछटा व रचना हे निसर्गात गेल्यावरच कळतात असे, त्यांनी नमूद केले. चित्रकलेचे शिक्षण घेताना प्रत्येक माध्यमाच्या वापरामुळे त्याची ओळख होते. त्यावर प्रभुत्व मिळवता येते असे त्यांनी सांगितले आणि विद्यार्थिनींच्या शंकांचे समाधान हे त्यांनी केले .
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले , मो . ८२०८१०८०५१०