जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.13 जानवरी 2025
β⇔वणी (नाशिक),ता.13(प्रतिनिधी: सुरेश सुराशे ):- ५२ व्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री मा. ना. नरहरी झिरवाळ साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला. शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक आणि जिल्हा विज्ञान अध्यापक संघ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ ते १३ जानेवारी या कालावधीत सदरचे प्रदर्शन श्री. किसनलालजी बोरा इंग्लिश मिडीयम स्कूल वणी ता. दिंडोरी येथे पार पडणार आहे. उद्घाटन समारंभासाठी दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार मा. श्री. भास्कर भगरे, कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मा. श्री. श्रीराम शेटे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. मा. श्री. प्रविण पाटील सर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी कार्यक्रमांचे प्रास्ताविक केले तर संस्थेचे चेअरमन श्री. महेंद्रजी बोरा, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष विनीत पवार यांनी मार्गदर्शन केले. मा. श्री उदय देवरे साहेब, मा. श्री प्रकाश आहिरे साहेब मा. श्री गणेश फुलसुंदर साहेब उपशिक्षणाधिकारी आणि विज्ञान पर्यवेक्षिका श्रीमती संगीता क्षत्रिय यांच्यासह विज्ञान अध्यापक संघाचे राज्याध्यक्ष दिनेश पवार, जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष किरण पगार, सहअध्यक्ष सचिन शेवाळे, कार्यवाह अरुण पवार, कल्पेश चव्हाण, अनिल रौंदळ तसेच योगेश जाधव, संजय मगर, संग्राम करंजकर, रमाकांत भामरे, सुभाष सोनवणे, विक्रम राठोड आदी पदाधिकारी कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाठी कार्यरत होते. दिंडोरी तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष डी जी वाणी यांनी सूत्रसंचालन केले तर बागलाण तालुका अध्यक्ष दत्ताजी ह्याळीज, जिल्हा विज्ञान मार्गदर्शक मंडळातील के के अहिरे, डी यू अहिरे, किशोर जाधव, वाय. आर. पवार यांनी प्रदर्शनास भेट दिली.
किसनलालजी बोरा शिक्षण संस्थेच्या वतीने विश्वस्त श्री. किशोरजी बोरा, गितेशजी बोरा यांच्यासह विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती योगिता चिंचोले यांनी प्रदर्शन स्थळ, सहभागी विद्यार्थ्यांची निवास आणि भोजन व्यवस्था याचे नियोजन केले. साधारणपणे ४५० प्रदर्शनार्थी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक आपल्या १९२ प्रतिकृती या ठिकाणी सादर करणार आहेत. रांगोळी कलाकार श्री. संजय खैरे यांनी विद्यालयाचा प्रांगणात माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम आणि किसनलालजी बोरा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय श्री किसनलालजी बोरा यांच्या रांगोळीतून साकारलेल्या प्रतिमा आकर्षणाचे केंद्र होते. जिल्हाभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सादर केलेल्या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिल्या दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमांची सांगता झाली.
विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासन कटिबध्द असल्याचे मंत्री महोदयांचे आश्वासन..
तालुका आणि जिल्हा स्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनासाठी शासनाकडून कुठल्याही निधीची तरतूद केली जात नाही, पर्यायाने सेवाभावी शिक्षण संस्थांच्या आर्थिक मदतीने ही प्रदर्शने घेतली जातात. तरी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या धर्तीवर याही आयोजनासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा आणि कला ( शासकीय रेखाकला परीक्षा ) आणि क्रीडा क्षेत्रात विशेष प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेत अतिरिक्त ५% गुण दीले जातात त्याच धर्तीवर विज्ञान प्रदर्शनात जिल्हा आणि राज्यस्तरावर निवडपात्र विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावे अशी मागणी नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री विनीत पवार यांनी यावेळी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री मा. ना. नरहरी झिरवाळ साहेब यांनी आपल्या या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )