लालबहादुर शास्त्री व महात्मा गांधी जयंतीचे अवचित्य साधून चेहडीला कै. ह.भ.प.भिमाजी गुरव स्मृतीदिनी वृक्षारोपण
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि 9 ऑक्टोबर 2023
β⇒ चेहडी ( नाशिक ) : ता. 10 ( प्रतिनिधी : पांडुरंग गुरव ) :- दारणा नदी तीरावर महादेव मंदिर येथे नाशिक जिल्हा गुरव समाज सामाजिक विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष पांडुरंग गुरव यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला .
लालबहादुर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जयंतीचे अवचित्य साधून व कैलासवासी ह.भ.प.भिमाजी बहिरू गुरव यांच्या 30 व्या स्मृतीदिनी चेहडी येथे 2 ऑक्टोबर रोजी वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. स्वतः घरी आणलेली फळे म्हणजेच जांभूळ ,करवंद, आंबा, शेवगा, लिंबू ,चिंच ,मोसंबी, पेरू, सिताफळ यांचे बी तयार करून त्याची रोपे तयार करून वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी बालगोपाल व ज्येष्ठ नागरिक साक्षी सचिती, दक्ष सचिती ,कौसाबाई ताजनपुरे, सुखदेव अष्टेकर, सुनीता ताजनपुरे ,मीराबाई ताजनपुरे, ऋषिकेश गुरव ,यशराज गुरव, ओमकार गुरव, रविशंकर गुरव, इत्यादी उपस्थित होते.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो ८२०८१८०५१०