β : नाशिक :⇒ एस.एम. आर.के. बी. के. ए. के. महिला महाविद्यालयात ‘हिंदी दिवस’ साजरा – ( प्रतिनिधी : छाया लोखंडे -गिरी )
β : नाशिक :⇒ एस.एम. आर.के. बी. के. ए. के. महिला महाविद्यालयात 'हिंदी दिवस' साजरा - ( प्रतिनिधी : छाया लोखंडे -गिरी )
एस.एम. आर.के. बी. के. ए. के. महिला महाविद्यालयात ‘हिंदी दिवस’ साजरा
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि. 16 सप्टेंबर 2023
β⇒ नाशिक, ता.16 ( प्रतिनिधी : छाया लोखंडे -गिरी ) :- येथील एस.एम. आर.के. बी. के. ए. के. महिला महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने ‘हिंदी दिवस समारंभ’ आयोजित करण्यात आला होता. गोखले शिक्षण संस्थेच्या सचिव व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कार्यक्रमाचे आयोजन झाले. समारंभाला प्रमुख पाहुणे एच.पी.टी. महाविद्यालय व नाशिक रोड महाविदयालयाचे निवृत्त प्रा. डॉ कन्हैयालाल होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा.डॉ. गीता यादव ह्यांनी पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले. हिंदी भाषेला सशक्त राष्ट्रभाषा बनविणे आपले कर्तव्य आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सौ .कविता पाटील होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात हिंदी भाषेचे महत्व स्पष्ट केले. महाविद्यालयाच्या हिंदी विभागाची परंपरा स्पष्ट केली. हिंदी विभागाने आयोजित केलेल्या हिंदी सप्ताहात काव्य वाचन, वक्तृत्व , प्रश्न मंजूषा, निबंध लेखन , कहानी लेखन , घोषवाक्य लेखन अशा स्पर्धा घेतल्या गेल्या. स्पर्धांमध्ये गायत्री शिंदे , नगमा अंसारी, संजारिया कोकणी , मुस्कान अली,जारा किराणावाला , शीतल विश्वकर्मा , रिशू पंडित , पायल जाधव , मयुरी सोनवणे , वंदना विश्वकर्मा , अमन शेख, कनिषा पंडित , जुगनू सिंग ह्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. आपल्या मार्गदर्शन पर भाषणात प्रा. डॉ. कन्हैयालाल ह्यांनी हिंदी भाषेचे गरिमामयी परंपरा , राजभाषा हिंदीचे स्वरूप , हिंदीतील रोजगारांच्या संधी ह्या विषयांवर विद्यार्थिनींशी संवाद साधला. विद्यार्थिनींनी त्यांना आपले प्रश्न विचारले. गायत्री शिंदे ह्या विद्यार्थिनीने स्वरचित कविता प्रभावीपणे सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. विजय घोरपडे व प्रा. उज्चला अहिरे ह्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नगमा अन्सारी व कु. गायत्री शिंदे ह्यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. रसिका सप्रे ह्यांनी केले.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०