





बिटको महाविद्यालय मुलींच्या संघाने आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत विजेतेपद
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि 13 ऑक्टोबर 2023
β⇒ नाशिकरोड , ता 13 ( प्रतिनिधी : संजय परमसागर ):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील मुलींच्या संघाने शुक्रवार दि.१३ ऑक्टोबर रोजी पीटीसी ग्राउंड येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवले .
के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या संघासोबत झालेल्या अंतिम सामन्यामध्ये २-० असा पराभव करत मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवले . सर्व विजेत्या खेळाडूंचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी , उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पाठारे , डॉ.आकाश ठाकूर , डॉ. विशाल माने , डॉ. संतोष पगार क्रीडा शिक्षक डॉ. धनंजय बर्वे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या .
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो .८२०८१८०५१०
