Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : श्रीगोंदा (अहमदनगर ) :⇔ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार दिगंबर भुजबळ यांना प्रदान-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)

β : श्रीगोंदा (अहमदनगर ) :⇔ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार दिगंबर भुजबळ यांना प्रदान-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)

018491

 राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार दिगंबर भुजबळ यांना प्रदान 

β : श्रीगोंदा (अहमदनगर ) :⇔ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार दिगंबर भुजबळ यांना प्रदान-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)
β : श्रीगोंदा (अहमदनगर ) :⇔ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार दिगंबर भुजबळ यांना प्रदान-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 15 जून  2024

β⇔श्रीगोंदा (अहमदनगर ), दि.15 (प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले):-“राजे शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार” मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर, (जि. बुलढाणा) या संस्थेतर्फे  राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्राथमिक शिक्षक दिगंबर गोरख भुजबळ (पेडगाव जुने, ता. श्रीगोंदा )यांना नुकताच प्रमुख अतिथी वसंत विठ्ठल पाटील (सेवातीर्थ धाम (वृद्धाश्रम) दाताळा, ता. मलकापूर जि. बुलढाणा), प्रमुख अतिथी संदीप इंगळे, ( सहाय्यक पोलीस निरीक्षक मलकापूर, हायवे ट्राफिक विभाग), विवेक सुभाष राजापुरे (मल्टीपर्पज फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष) या मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व  ट्रॉफी देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रम  तालुका शिक्षक संघ पतसंस्था हॉल भ्रातृमंडळ समोर चाळीस विद्या मलकापूर येथे संपन्न झाला.

      उल्लेखनीय शैक्षणिक कार्य :-
β : श्रीगोंदा (अहमदनगर ) :⇔ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार दिगंबर भुजबळ यांना प्रदान-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)
β : श्रीगोंदा (अहमदनगर ) :⇔ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार दिगंबर भुजबळ यांना प्रदान-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)
              प्राथमिक शिक्षक  दिगंबर भुजबळ यांना  उल्लेखनीय शैक्षणिक कार्यामुळे सदर पुरस्कार मिळाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अनु.जाती /अनु.जमाती व भटक्या विमुक्त लोकांची बहुसंख्य लोकवस्ती असलेली व तालुक्यापासून दूर असलेली दुर्लक्षित शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडारवस्ती येथे सन-२००७ पासून १० वर्षे विविध उपक्रम राबवून शाळा नावारुपास आणली. शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच सहल एसटी बसने गेली, लोकसहभागातून व श्रमदानातून शाळेची विविध कामे केली. शाळेचे सर्व वर्ग सेमी माध्यमातून सुरु केले. त्यामुळे शाळेच्या शेजारीच इंग्रजी माध्यमाची शाळा असताना देखील शाळेची पटसंख्या वाढून २ शिक्षकी असलेली शाळा ४ शिक्षकी झाली आहे. या शाळेने जिल्हा ग्रामीण आदर्श शाळा पुरस्कारासाठी सहभाग घेतला. शाळा डिजिटल करून  विविध स्पर्धा परीक्षेतील अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला आहे. 
        त्यानंतर सन २०१८ पासून मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेडगाव जुने ता. श्रीगोंदा येथे कार्यरत आहे. येथे ही मी माझ्या सहकार्यांच्या मदतीने शाळेत अनेक उपक्रम राबवले आणि राबवत आहे. मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी मुलांची प्रगती व दैनिक अभ्यास पालकांना SMS द्वारे कळवणे. मुलांच्या वाढदिवसाला चॉकलेट न वाटता त्यापेक्षाही कमी रकमेतून शाळेला एक फुलझाड किंवा शोभेचे झाड भेट देण्याचा उपक्रम सुरु केला व त्यातूनच शाळेची बाग फुलवली. शैक्षणिक सहल, क्षेत्रभेट, वनभोजन यातून विविध ठिकाणी भेट देऊन मुलांना ऐतिहासिक वास्तू व परिसरातील विविध उद्योगांची व वारशाची माहिती मुलांना देणे. सर्व शाळा व सर्व वर्ग डिजिटल केले आहेत. शाळेचे सर्व कामकाज संगणकाद्वारे विविध सॉंप्टवेअचा वापर करून केले जात आहे. विविध गुणदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन मुलांच्या कला गुणांना वाव दिला जातो.
      यावर्षीच्या कार्यक्रमातून जमा झालेल्या ६६,000 रु.रकमेतून संपूर्ण कंपाऊंड भिंत बोलकी मोलाचा हातभार आहे. अभ्यासक्रमाचे व विविध उपक्रमांचे व्हिडीओ तयार करून युटूब वर अपलोड केले आहेत. आकर्षक संगीत कवायत, संगीत व्यायाम व संगीत लेझीम पथक तयार करून मुलांच्या कलागुणांना वाव देत आहे. तंत्रस्नेही शिक्षक म्हणून केंद्रस्तरीय शिक्षण परिषदामध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करत आहे. मुलांना व्यवहार ज्ञान व्हावे या उद्देशाने शाळेत विद्यार्थी बचत बँक स्थापन केली आहे.या बँकेचा सर्व कारभार विद्यार्थीच पाहतात. तसेच शाळेत बालआनंद मेळावा व आनंदी बाजाराचे आयोजन करून मुलांच्या व्यवहार ज्ञानाचे दृढीकरण केले जात आहे. संपूर्ण शाळा तर डिजिटल आहेच परंतु लोकसहभागाच्या माध्यमातून शाळेच्या १ वर्गामध्ये ४२ इंची स्मार्ट एल इ डी टीव्ही बसवून इ-लर्निंग केले जात आहे. शिवदुर्ग टे्कर्स फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमात सहभाग कामामुळे पुरस्कार मिळाला आहे.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.   ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज”)

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!