





ऐन रमजान उपवासाच्या सणासुदीवर महावितरणाकडुन येडशीत विद्युत पुरवठा खंडित.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि.1 मार्च 2025
β⇔येडशी (धाराशिव )दि.14 (प्रतिनिधी: सुभान शेख ):- ऐन रमजान उपवासाच्या सणासुदीवर महावितरणाकडुन येडशीत विद्युत पुरवठा खंडित.
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील ग्रामस्थांना कडून मिळालेल्या माहितीनुसार अशी की , येडशीत मागील काही दिवसांपासून महावितरणाकडुन दररोज सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. कधी रात्री – अपरात्री , पहाटे , सकाळी , दुपारी , संध्याकाळी अशा अनेक वेळेस 33 केव्ही थ्री फेज चा विद्युत पुरवठा खंडित होत आहे. आज नविन वर्ष 2025 च्या हिंदू – मुस्लिम समाजाचे सणासुदी आहेत. तसेच , येणाऱ्या मार्च महिन्यात 2 तारीख पासुन मुस्लिम समाज बांधवांचे पवित्र मानला जाणारा रमजान ईद महिना सुरू होत आहे. या रमजान ईद उपासाच्या महिन्यात मुस्लिम समाज बांधव रात्री – अपरात्री पहाटेच्या तीन वाजल्यापासून सहेरी करण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी जागृत करावे लागते. जर या महावितरणाने दररोज विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. आणि तसेच , या अंधारात अनोळखी व्यक्ती चोरी करण्यासाठी आलेले नागरिकांना किंवा महिलांना मारहाण केली तर , करायचे काय ? असे प्रश्न उपस्थित होत आहे. व येडशी गावातील ग्रामपंचायत ने सुद्धा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये जनतेला विद्युत लाईटची सुरळीत सेवा देण्यात यावे.अशी माहिती देऊन महावितरणाला पत्रा द्वारे कळवावे लागते. परंतु , हि ग्रामपंचायत कोणतेही पाऊल उचलत नाही. जर या पवित्र मानला जाणारा रमजान उपवासाच्या महिन्यात महावितरणाकडुन विद्युत लाईट ची सुरळीत सेवा देत नाही. तर , मुस्लिम समाज बांधवांनी उपवासाठी सहेरी करायचे कशी ? असे अनेक वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहे. तरी या महावितरणाचे धाराशिवचे वरिष्ठ अधिकारी यांनी लवकरात – लवकर दखल घेऊन , वर्षांतुन तीन ते चार वेळेस येडशीत विद्युत लाईट ची पाहणी करण्यासाठी ये – जा करण्यासाठी करावे लागते. परंतु , या महावितरणाकडुन कोणीही फिरकुन पाहत नाही. तरी महावितरण विद्युत लाईटचे धाराशिव चे वरिष्ठ अधिकारी लवकरात – लवकर दखल घेऊन मुस्लिम समाज बांधवांना रमजान उपवासाच्या महिन्यात उपवास धरण्यासाठी विद्युत लाईटची सुरळीत सेवा देण्यात यावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )