प्रबोधन विद्यालय अंबाठा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 20 फेब्रुवारी 2024
β⇔सुरगाणा ,दि.20(प्रतिनिधी : एकनाथ शिंदे):-सुरगाणा तालुक्यातील प्रबोधन विद्यालय अंबाठा येथे विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा अविष्कार सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार रोजी पार पडले.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजवलनाने झाली.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत कबड्डी स्पर्धा,खो-खो स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, अक्षरलेखन स्पर्धा व आदिवासी आधार माहिती फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना एक ते तीन क्रमांक काढून विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.सुवर्ण पदक, रजत पदक, आणि कास्य पदक, पदकमिळालेल्या विद्यार्थीचा मेडल व प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला.यास्नेहसंमेलनामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र,गुजरात, तामिळनाडू,आसाम आशा विविध राज्यांचे समूह नृत्य कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाब गावित, प्रमुख पाहुणे फा. शाबी कोरिया एस जे, अतिथी मिताली धूम. एडवोकेट नाशिक, प्रकाश चौधरी. रेडिओलॉजिस्ट नाशिक. व्यवस्थापक फा. पॉल राज एस जे. मुख्याध्यापिका थेरेसा जी वी एफ सी. शाळेतील शिक्षक, पालक व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510