β : नाशिक :⇔एस एम आर के. बी के. ए के महिला महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न -(प्रतिनिधी : छाया लोखंडे-गिरी
β : नाशिक :⇔एस एम आर के. बी के. ए के महिला महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न -(प्रतिनिधी : छाया लोखंडे-गिरी
एस एम आर के. बी के. ए के महिला महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 17 मार्च 2024
β⇔, नाशिक, दि.17 (प्रतिनिधी : छाया लोखंडे-गिरी ):-एस एम आर के. बी के. ए के महिला महाविद्यालयात एच. एस. सी व्होकेशनल विभागाच्या फूड प्रोडक्टस् टेक्नॉलॉजी व टूरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट या अभ्यासक्रमांमार्फत पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची प्रस्तावना व मान्यवरांचे स्वागत एच. एस. सी. व्होकेशनल विभाग समन्वयक मैथिली लाखे यांनी केले.
याप्रसंगी लिंकेज कमिटी सदस्यांना पालकांसोबत संवाद साधण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. श्रीराम फूड्स च्या अर्चना कुलकर्णी यांनी पाल्याचे खरे रोल मॉडेल पालक असतात असे प्रामाणिक मत व्यक्त केले. सुजय हॉलीडेज चे संचालक जयेश तळेगांवकर यांनी ऑन द जॉब ट्रेनिंग बाबत महत्वाच्या गोष्टीं बद्दल चर्चा केली. दूर्वांकुर ट्रॅव्हल्स चे मानस लोहोकरे हयांनी प्रात्यक्षिक अनुभव विद्यार्थ्यांनींसाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादित केले. जहागीरदार फूड्स चे संचालक मिलिंद जाहगिरदार ह्यांनी विद्यार्थी जीवनात असलेल्या महत्वाच्या गोष्टीं बाबत विद्यार्थिनी – पालकांना संबोधित केले.लिंकेज कमिटी सदस्य, कॅम्पस चॉईस चे संचालक योगेश मेटकर, पफ अँड रोल्स चे संचालक शाहरुख पटेल, करी लिव्हजचे संचालक विक्रम उगले हे कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या संध्या खेडेकर यांनी विद्यार्थिनी – पालकांचे कौतुक करून विद्यार्थिनींनी आपले ध्येय मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील असावे असे सूचीत केले.कार्यक्रमाला उपप्राचार्या डॉ. नीलम बोकील ह्यांचेचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . कनिष्ठ विभागाच्या समन्वयक शोभा त्रिभुवन तसेच सर्व प्राध्यापक वर्ग , विद्यार्थीनी व पालकवर्ग मोठया संखेने उपस्थित होते. पालक मेळाव्या करिता एच. एस. सी वोकेशनल विभागाच्या श्रीमती मैथिली लाखे व विभागाच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
आभार प्रदर्शन वैशाली चौधरी हयांनी केले तर सुत्रसंचालन वैशाली गायकवाड यांनी केले. .
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510