β : नाशिक :⇔ प्राचार्य डॉ. विलास आवारी, डॉ. निलोफर शेख यांचे संशोधन पेटंट शासकीय जर्नलमध्ये प्रकाशित-( प्रतिनिधी : डॉ.भागवत महाले )
β : नाशिक :⇔ प्राचार्य डॉ. विलास आवारी, डॉ. निलोफर शेख यांचे संशोधन पेटंट शासकीय जर्नलमध्ये प्रकाशित-( प्रतिनिधी : डॉ.भागवत महाले )
प्राचार्य डॉ. विलास आवारी, डॉ. निलोफर शेख यांचे संशोधन पेटंट शासकीय जर्नलमध्ये प्रकाशित
β : नाशिक :⇔ डॉ. निलोफर शेख यांचे संशोधन पेटंट शासकीय जर्नलमध्ये प्रकाशित-( प्रतिनिधी : डॉ.भागवत महाले )
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : नाशिक : शनिवार : दि.16 डिसेंबर 2023
β⇔नाशिक, ता 16 ( प्रतिनिधी : डॉ.भागवत महाले ):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित, कला आणि वाणिज्य महाविद्यालय दोडी बुद्रुक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास आवारी व डॉ. निलोफर शेख यांच्या भारतातील स्वदेशी कंपन्यांच्या वृद्धी आव्हानांचे मूल्यमापन या संशोधनपर पेटंटला भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आद्योगिक धोरण आणि संवर्धन विभागाच्या पेटंट डिझाईन्स आणि ट्रेड मार्क विभागाच्या नियंत्रक जनरल कार्यालयातर्फे मंजुरी नुकतीच देण्यात आली आहे.
सदर पेटंटमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ७० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पुढे देशातील अनेक स्वदेशी कंपन्यांचे जीवन आमूलाग्र बदलले आहे. गेल्या दोन दशकांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणामुळे जागतिक आणि स्वदेशी कंपन्यांमधील स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे भारतातील स्वदेशी कंपन्यांच्या संख्येत, विशेषतः उत्पादन आणि सेवा क्षेत्रात वाढ झाली आहे. या संस्थांना मर्यादित भांडवल आणि तांत्रिक संसाधने, मानवी संसाधनांची कमतरता, व्यापक आर्थिक अस्थिरता आणि सामाजिक जबाबदारीची मागणी यासारख्या वाढीच्या आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. या संस्थांच्या वाढीच्या आव्हानांचे मूल्यमापन करण्यासाठी, नियामक वातावरण, वित्त उपलब्धता, संस्थात्मक समर्थन आणि सामाजिक भांडवलाची उपस्थिती यासह अनेक पैलूंचा विचार करणे आवश्यक आहे. या सर्वच पैलूंचा सूक्ष्म अभ्यासपूर्ण संशोधनातून मांडणी या निमित्ताने प्रथमत: करण्यात येत असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास आवारी यांनी सांगितले. तर हा शोधनिबंध भारतातील स्वदेशी कंपन्यांच्या वाढीच्या आव्हानांचे विश्लेषण करेल, विशेषत: नियामक वातावरण, वित्त उपलब्धता, संस्थात्मक समर्थन आणि सामाजिक भांडवल यांच्यातील परस्पर संवादावर भर दिला जाईल , असे डॉ. निलोफर शेख यांनी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. विलास आवारी व डॉ. निलोफर शेख यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनपर पेटंट मंजुरीनिमित्त श्री ब्रम्हानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग केदार. उपाध्यक्ष कारभारी आव्हाड, सचिव राजाराम आव्हाड, सहसचिव संपत शेळके, खजिनदार तुकाराम केदार, संस्था विश्वस्त रमेश पाटील, संजय कुलकर्णी, निवृत्ती केदार, किसन आव्हाड, माधव आव्हाड, ज्ञानेश्वर आव्हाड, कृष्णा आव्हाड, जि. प. सदस्य निलेश केदार, रमेश उगले,अशोक सांगळे , महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सेवक वृंद यांनी अभिनंदन केले.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०