‘संचमान्यता ‘व ‘कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णय रद्द’सह इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर शिक्षक संघटनांचा महामोर्चा संपन्न
β : नाशिक:⇔नाशिक जिल्ह्यात सर्व शिक्षक संघटनांचा गोल्फ क्लब मैदानावर विराट मोर्चा-(प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)
नाशिक जिल्ह्यात सर्व शिक्षक संघटनांचा गोल्फ क्लब मैदानावर विराट मोर्चा
प्रशिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नाशिकमध्ये भव्य मोर्चा
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 25 सप्टेंबर 2024
β⇔नाशिक,दि,25(प्रतिनिधी : रावसाहेबजाधव ):-विद्यार्थी आणि शिक्षकांवरील संचमान्यता तसेच कंत्राटी शिक्षक भरतीबाबत शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी २५ सप्टेंबर २०२४ रोजी नाशिकच्या गोल क्लब मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला. महामोर्चा: राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षकांनी दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी सामूहिक किरकोळ रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन केले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, शिक्षक, विद्यार्थ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. विशेषतः शिक्षण हक्क कायद्याच्या २००९ मधील तरतुदींना विसंगत ठरलेल्या १५ मार्च २०२४ आणि ५ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयांमुळे या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
β : नाशिक:⇔नाशिक जिल्ह्यात सर्व शिक्षक संघटनांचा गोल्फ क्लब मैदानावर विराट मोर्चा-(प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)
शिक्षणाचे संकट: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले असून, शासनाने घेतलेल्या निर्णयांमुळे त्या शाळांचे भवितव्य अधांतरी राहिले आहे. या निर्णयांमुळे पालक आणि शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांना तीव्र आंदोलनाची गरज भासली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात १४ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडली, ज्यात आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली.
β : नाशिक:⇔नाशिक जिल्ह्यात सर्व शिक्षक संघटनांचा गोल्फ क्लब मैदानावर विराट मोर्चा-(प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)
मागण्या: १) १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा. २) २० किंवा त्याहून कमी पटसंख्येच्या शाळांमधील शिक्षकांची पदे बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या करण्याचा ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय रद्द करावा. ३) आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे. ४) सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या वेतन त्रुटी दूर कराव्यात. ५) १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना १९८२ च्या पेन्शनचे आदेश लागू करावेत. ६) विद्यार्थ्यांना मोफत गणवेश त्वरित उपलब्ध करावेत आणि जुन्या पद्धतीने गणवेश योजना राबवावी. ७) शिक्षकांवर शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचे ओझे कमी करावे. ८) जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी निवासाची सक्ती रद्द करावी. ९) शिक्षकांना १०-२०-३० सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी. १०) अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षकांसाठी TET अनिवार्यता रद्द करावी. ११) मनपा शिक्षकांना वेतनाचे १००% अनुदान द्यावे. १२) शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी. १३) शाळांवरील विविध अभियाने, उपक्रम, व बाह्य परीक्षा तात्काळ थांबवाव्यात.
β : नाशिक:⇔नाशिक जिल्ह्यात सर्व शिक्षक संघटनांचा गोल्फ क्लब मैदानावर विराट मोर्चा-(प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)
आंदोलनाचे स्वरूप: १) न्याय मिळेपर्यंत काळ्या फिती लावून विरोध प्रदर्शन करणे. २) सर्व शिक्षक प्रशासनाच्या WhatsApp गटांतून बाहेर पडून असहकार आंदोलन करणार आहेत. ३) २५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षकांनी पालकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.या आंदोलनात राज्यभरातील शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि सामान्य शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)