





चांडक बिटको महाविद्यालयाचे हिंगणवेढे येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन उत्साहात संपन्न...

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 8 फेब्रुवारी 2024
β⇔ नाशिकरोड,दि.8 (प्रतिनिधी:संजय परमसागर):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील चांडक बिटको चांडक महाविद्यालयाचे “राष्ट्रीय सेवा योजना” विभागावतीने ‘विशेष श्रम संस्कार शिबिर’ दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ ते १४ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान हिंगणवेढे, ता. जि. नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबीराचे उद्घाटन ८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
सदर शिबिराचे उद्घाटन गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व सह कोषाध्यक्ष डॉ.आर पी देशपांडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी बीवायके महाविद्यालयाचे प्राचार्य व नाशिकरोड सेंटरचे शाखा सचिव डॉ. व्ही. एन.सूर्यवंशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषणात डॉ. आर पी देशपांडे यांनी विद्यार्थी जीवनात श्रम संस्काराचे महत्त्व आणि देशाच्या जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे युवकांची राष्ट्र विकासात काय भूमिका आहे. याविषयी उपस्थित एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रो.डॉ. मंजुषा कुलकर्णी, कला शाखेचे उप प्राचार्य डॉ.अनिल कुमार पठारे विज्ञान शाखेचे समन्वयक डॉ.के सी टकले सर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पगार, डॉ. सुधाकर बोरसे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. कांचन सनानसे,डॉ. वंदना शेवाळे, डॉ. प्रसाद पागधरे, डॉ .नितीन जोशी, विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष सहा. प्रा. लक्ष्मण शेंडगे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विशाल माने, डॉ. भागवत गाडेकर, प्रा. वसीम बेग, प्रा. नरेश पाटील, प्रा. गणेश दिलवाले, डॉ. दिनेश बोबडे, डॉ. विजय सुकटे, डॉ. सुभाष भोसले, जयंत भाभे, हिंगणवेढे गावचे सरपंच सरपंच सौ. ज्योती कृष्णा नागरे, उपसरपंच सौ. उषा सुनील वाघ, कृष्णा नागरे, ग्राम विकास अधिकारी ज्ञानेश्वर भोर पोलीस पाटील दयाजी शिंदे वि. का.सोसायटीचे चेअरमन साहेबराव निवृत्ती धात्रक, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर बाळू वाघ, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापिका बासंती देवरे, ग्रामपंचायत सदस्य भास्कर भीमा कराड, संजय जयराम मोरे, संगीता खंडू धात्रक सुरेश विंचू मोरे, प्रकाश मडके, खंडू धात्रक, योगेश क्षीरसागर यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर दिवशी कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. अनिलकुमार पठारे यांचे लोकसंख्या नियंत्रण या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पगार यांनी केले. प्राचार्य डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी राष्ट्रउभारणीत एनएसएस स्वयंसेवकाचे योगदान मोलाचे असून व्यक्तिमत्व विकास साध्य होत असल्याचे मनोगत व्यक्त केले. या शिबिरात विविध उपक्रम व तज्ञांचे व्याख्यान संपन्न होणार असल्याचे रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पगार यांनी सांगितले.डॉ.सुधाकर बोरसे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. कांचन सनानसे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले .
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510