





जऊळके वणी येथील रंगोत्सव सेलिब्रेशनच्या स्पर्धेत 13 विद्यार्थी ठरले इंटरनॅशनल स्पर्धेसाठी पात्र

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.27 जानेवारी 2025
- β⇔ दिंडोरी(नाशिक)ता.27(प्रतिनिधी: रावसाहेब जाधव ):- जिल्हा परिषद शाळा जऊळके वणी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी जिल्हा परिषद शाळा जऊळके वणी येथे शिवसेना संपर्कप्रमुख श्री सुनील नाना पाटील , आदरणीय गणपत काका पाटील,तसेच गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री योगेश भाऊ दवंगे,प्रतिष्ठित नागरिक शेतकरी व ग्रामस्थ ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेच्या ध्वजाचे ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सूर्यभानजी साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले तसेच याप्रसंगी रंगोत्सव सेलिब्रेशन मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील करण्यात आले. 24/25 मध्ये एकूण 67 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला होता.त्यापैकी तेरा विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
स्पर्धेचे संपूर्ण नियोजन व कार्यवाही श्रीमती पगारे मॅडम यांनी पार पाडली. यात प्रथम क्रमांकाला ट्रॉफी तसेच चार गोल्ड मेडल व आठ सिल्वर मेडल तसेच ब्रांझ मेडल विद्यार्थ्यांनी पटकावले आहेत. सहभागी सर्वच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री नाठे सर, श्रीमती बोरसे मॅडम श्रीमती केंद्रे मॅडम,श्रीमती पगारे मॅडम,पूजा मॅडम उपस्थित होते. अशाप्रकारे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार पडण्यात पार पाडण्यात आला.
-
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )