एसटी महामंडळाच्या बस मधील डिझेल चोरी करणाऱ्यास सापळा रचून अटक

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 15जानेवारी 2024
β⇔सिन्नर, दि.15 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- सिन्नर – बेलू येथे कारमध्ये येऊन एसटी महामंडळाच्या मुक्कामी बसमधून डिझेल चोरी करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. मुक्कामी असलेल्या बसमधून 120 लिटर डिझेलची चोरी झाली होती. गुप्त माहितीनुसार बसमधून डिझेलची चोरी हा राहता तालुक्यातील अविनाश कुंदे यांनी केली असल्याचे पोलिसांना कळाले , कुंदे हा शिर्डी – सिन्नर महामार्गाने त्याच्या स्विफ्ट कारणे नाशिककडे येत असल्याची माहिती पथकाला मिळाली, त्यानुसार पथकाने शहराजवळील गुरेवाडी फाटा येथे साध्या वेषात सापळा रचून त्यास अटक केली आहे. संबधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढिल तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती प्रतिनिधी सिन्नर सुरेश इंगळे यांनी दिली आहे .
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो ८२०८१८०८१०