गोखले फार्मसी महाविद्यालयाच्या पै.श्रेयस भुतडा ला कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक !
β : नाशिक:⇔गोखले फार्मसी महाविद्यालयाच्या पै.श्रेयस भुतडा ला कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक !β:नाशिक:(प्रतिनिधी:छाया लोखंडे-गिरी)
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि, 01 फेब्रुवारी 2024
β⇔:नाशिक:दि,29(प्रतिनिधी:छाया लोखंडे-गिरी):- नाशिक नमो चषक कुस्ती स्पर्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा दि.२३ व २४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आल्या.याच अनुषंगाने नाशिक मध्यच्या आमदार सौ.देवयानी फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ४०,५०,५७,६५,७०,७४,८० किलो वजनी गटात नमो चषक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . .सदर स्पर्धेत गोखले एजुकेशन सोसायटी संचलित, सर डॉ.मो.स.गोसावी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या कु.श्रेयस भुतडा याने ५७ किलो वजनी गटात तिसरा नंबर मिळवत कांस्य( Bronze ) पदक पटकावले आहे. प्रमाणपत्र, कांस्यपदक व रुपये १५००/-रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आमदार सौ.फरांदे आपल्या भाषणात म्हणाल्या कि,नमो चषकच्या माध्यमातून ‘सुदृढ भारत निरोगी भारत ‘ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच संकल्पना आहे. नेहमी त्याच माध्यमातून भविष्यातील भारत घडविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात .त्यात खेळाला महत्व नसून त्या खेळाच्या माध्यमातून लोकांना जोडणं, त्यांच्याशी सवांद साधने, त्यांच्या तब्बेतीची काळजी घेणे असे असून कुस्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शरीर निरोगी राहते. त्याच बरोबर त्यांच्या महाविद्यालयाचे ही नाव उंचावते, असेही त्या पुढे म्हणाल्या.सदर कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील बऱ्याच युवकांनी सहभाग नोंदविला होता. गोखले एजुकेशन सोसायटीच्या सचिव तथा मानव संसाधन संचालिका डॉ.सौ.दीप्ती देशपांडे, प्रकल्प संचालक श्री.पी.एम.देशपांडे,आस्थापना संचालक शैलेश गोसावी,प्राचार्य डॉ.एस.वी.अमृतकार,उपप्राचार्य डॉ.प्रशांत पिंगळे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्रेयसचे कौतुक केले आहे.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. 8208180510
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)