





त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात “राष्ट्रीय शिक्षक दिनी” विद्यार्थी संवाद उपक्रम संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 06 सप्टेंबर 2024
β⇔त्र्यंबकेश्वर,(नाशिक) दि.06 (प्रतिनिधी : निलेश म्हरसाळे ):- मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर आणि महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०५ सप्टेंबर रोजी “करिअर कट्टा : राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी संवाद उपक्रम “आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे व महाराष्ट्र राज्य करिअर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोळे तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार हे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे व महाराष्ट्र राज्य करिअर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोळे बोलतांना म्हणाले की, “करिअर कट्टा अॅप द्वारे अत्यंत कमी शुल्कामध्ये स्पर्धा परीक्षाची तयारी करण्यासाठी लागणारा “आय.ए.एस आपल्या भेटीला” व कौशल्यपूर्ण उद्योजक होण्यासाठी “उद्योजक आपल्या भेटीला” या उपक्रमातून विद्यार्थी आपल्या भावी जीवनाची दिशा निश्चित करू शकतात. पदवी घेताना विद्यापीठाने अनिवार्य केलेले अतिरिक्त श्रेयांक करिअर कट्ट्याच्या AddOn कोर्स मधून सर्व विद्यार्थी पूर्ण करू शकतात. विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक व नोकरी विषयक अभिरुचीला खऱ्या अर्थाने व्यासपीठ देणारी ही विद्याथी कल्याणाची चळवळ आहे. यात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे काम यातून सुरू आहे”असे प्रतिपादन केले. याप्रसंगी नाशिक जिल्हा करिअर कट्टा समन्वयक प्रा. आर. डी. खुर्चे यांनी करिअर कट्टा उपक्रमाची माहिती दिली.

शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिलीप पवार आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की “ करिअर कट्टा द्वारे तयार होणारे उद्योजक व अधिकारी राष्ट्र विकासात भरीव योगदान देऊ शकतील. प्राप्त ज्ञान आणि कौशल्य यांच्या बळावर ते स्वतःच्या जीवनाची घडी बसवू शकतील. रोजगाराचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. त्याचा फायदा घेत आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थी आपले वेगळेपण सिद्ध करून शैक्षणिक,आर्थिक व वैज्ञानिक दृष्ट्या प्रगती करावी ”असे सांगितले.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे एकूण ७० विद्यार्थी व सर्व शाखेचे प्राध्यापक-प्राध्यापिका उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालय करिअर कट्टाचे समन्वयक प्रा. निलेश म्हरसाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अर्चना धारराव यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. ऋषिकेश गोतरणे व स्वागत प्रा. श्वेताली सोनवणे यांनी केले. प्रा. दिलीप भेरे यांनी आभार मानले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )