





महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या केंद्रप्रमुख पदोन्नती लढ्यास यश

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 6 मार्च 2024
β⇔दिंडोरी, दि.6(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव):-महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य सरचिटणीस- कार्यवाह संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात शिक्षक परिषदेने केंद्रप्रमुख भरतीसाठी पुकारलेल्या आंदोलन टप्पे टप्पा क्रमांक १-संजय बबनराव पगार यांचे इन्चार्ज केंद्रप्रमुखांना चार्ज सोडणेबाबत आवाहन पत्र,टप्पा क्रमांक २-प्रभारी केंद्रप्रमुखांस बहिष्कारासाठी प्रवृत्त करणे.,टप्पा क्रमांक ३- प्रभारी केंद्रप्रमुखांनी सामुहिक रित्या चार्ज सोडण्यासंबंधी शिक्षक परिषद पदाधिकाऱ्यांसमवेत मान.गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन.,टप्पा क्रमांक ४-लवकरात लवकर पदोन्नती होण्यासाठी जिल्हा परिषद समोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे धरणे आंदोलन,टप्पा क्रमांक ५-शिक्षणाधिकारी नितिन बच्छाव साहेब यांचे एक महिन्यात पदोन्नती बाबत आश्वासन,आंदोलनास यश-जिल्हा परिषद नाशिक दिं.४मार्च २०२४रोजी केंद्रप्रमुख पदोन्नती झाली.
याप्रसंगी संजय पगार यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीम.अशिमा मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी,शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव,उपशिक्षणाधिकारीभास्कर कनोज,एस.ओ.,ओ.एस. सर्व लिपिक वर्ग तसेच आंदोलनात सहभागी सर्व सामान्य शिक्षकवृंद यांचे आभार मानले.
यावेळी आंदोलनात जिल्हा नेते रमेश गोहिल, जिल्हा अध्यक्ष वासुदेव बोरसे,कार्यवाह राजेंद्र खैरनार, कोषाध्यक्ष सुनील अहिरे, कार्याध्यक्ष जितेंद्र खोर, शांताराम कापसे, तालुकाध्यक्ष रावसाहेब बहिरू जाधव,उपाध्यक्ष दीपक खैरनार,प्रवीण देशमुख, योगेश जाधव,रविंद्र ह्याळीज,चंद्रकांत पवार,भाऊसाहेब भदाणे,अरविंद माळी,पुंडलिक शिंगाडे,सुभाष बर्डे, यशवंत भामरे, सखाराम सोनवणे,दिपक आहिरे, प्रवीण कोळी,रविंद्र भरसट,मानसिंग महाले,वैभव उपासणी,अशोक पवार, कोषाध्यक्ष नितीन शिंदे, सुधाकर नाठे, विश्वास आहेर,दादा इथापे,संजय सोनवणे,शिवाजी भोसले, कैलास पाटोळे, छत्रिय सर,राजेंद्र पवार, मिलिंद धिवरे, ज्ञानेश्वर दाते,अनिल खैरनार,प्रभावती राऊत,अविनाश पाटील,शाहुल वानखेडे,यशवंत भामरे,अरुण इंगळे, मिलिंद इंगळे,किरण पाटील,उत्कर्ष कोंडावार,संजय जगताप,सुदाम बोडके,संजय सोनवणे (पेठ),प्रविण सोनवणे, समाधान गाडे, उत्कर्ष कोंडावार,किरण पाटील, प्रविण गरुड शेकडो पदाधिकारी व शिक्षकांनी सहकार्य केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510