β : सुरगाणा (नाशिक):⇔ सुरगाणा तालुक्यात पेसा क्षेत्रांतर्गत जिल्हा परिषद शाळेत सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने होणार नियुक्ती-(प्रतिनिधी : रतन चौधरी)
β : सुरगाणा (नाशिक):⇔ सुरगाणा तालुक्यात पेसा क्षेत्रांतर्गत जिल्हा परिषद शाळेत सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने होणार नियुक्ती-(प्रतिनिधी : रतन चौधरी)
सुरगाणा तालुक्यात पेसा क्षेत्रांतर्गत जिल्हा परिषद शाळेत सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने होणार नियुक्ती
26 जुलै पर्यंत इच्छुकांनी अर्ज करण्याचे गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख यांचे आवाहन…
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि. 24 जून 2024
β⇔सुरगाणा (शहर),(नाशिक) दि.24 (प्रतिनिधी : रतन चौधरी) :- शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक यांनी शासनाचा दि.15-07-2024 व 19-07-2024 चे परिपत्रक जारी केलेले असून नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात रुपये 20000/-( कोणताही लाभा व्यतिरिक्त ) मानधन तत्वावर पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेमधील रिक्त जागांवर कंत्राटी पद्धतीने पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेत शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता सदरचे पद भरण्यात येणार आहे. इच्छुक सेवा निवृत्त शिक्षकांना दिनांक 26 जुलै 2024 पर्यंत शिक्षण विभाग पंचायत सुरगाणा येथे अर्ज करण्याचे आवाहन अल्पा देशमुख ,गटशिक्षणाधिकारी सुरगाणा यांनी केले आहे.
♠ अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.
1) इच्छुक उमेदवार हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व खाजगी संस्थेच्या अनुदानित शाळेतून सेवानिवृत्त झालेले शिक्षक पाहिजेत.
2) या नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष राहील.
3) वयाचा पुरावा .
4) सेवा कालावधीत कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही अथवा न्यायालयीन प्रकरणी वादी /प्रतिवादी नसल्याचे स्व प्रमाणपत्र घ्यावे.
5) सेवा कालावधीत कोणत्याही प्रकारची शास्ती /निलंबन अथवा अन्य कारवाई झालेली नसल्याचे स्व प्रमाणपत्र घ्यावे.
6) सेवानिवृत्ती आदेश
7) सेवा कालावधीत विशेष पुरस्कार /पारितोषिक मिळाले असल्यास त्याचा पुरावा द्यावा.
8) नियुक्ती आदेश दिल्यावर शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागेल.
9) नियुक्ती दिल्यावर शिक्षण अधिकारी प्राथमिक यांना करारनामा करून द्यावा लागेल
10) जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरी करणे आवश्यक राहील( बंधपत्र/ हमीपत्र)द्यावे लागेल).
11) करार कालावधीत शैक्षणीक पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपली राहील.
12) करार पद्धतीने नियुक्ती दिल्यानंतर शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अटी अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचे तसेच करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कुठलेही हक्काची मागणी करता येणार नाही.
विहित कालावधीत प्राप्त पात्र असलेल्या उमेदवारांचा अर्जाचा विचार केला जाईल याची नोंद घ्यावी. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी २६ जुलै २०२४ पर्यंत तालुका पंचायत समिती सुरगाणा कार्यालयात अर्ज सादर करण्यात यावा. असे अल्पा देशमुख, गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती सुरगाणा यांनी केले आहे.
प्रतिक्रिया–“सुरगाणा गटात अनेक शिक्षकांची पदे रिक्त आहेत.ही पदे तात्काळ कंत्राटी भरल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यास निश्चितच मदत होणार आहे.”- अल्पा देशमुख, गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती सुरगाणा.
——————————————————————————————————————-
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)
—————————————————————————————————————–