





येडशी येथे महावितरणचा भोंगळ कारभार, गाव रात्रभर अंधाऱ्यात, नागरिक त्रस्त, प्रशासन सुस्त

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 20 ऑगस्ट 2024
β⇔येडशी (शहर), दि.20 (प्रतिनिधी : सुभान शेख ):- धाराशिव तालुक्यातील येडशी येथील ग्रामस्थांनाकडुन मिळालेल्या माहितीनुसार अशी की, काल दि.19 सोमवार रोजी संध्याकाळी सहा वाजता काळेकुट्ट आभाळ भरून आलेले पाऊसाला सुरवात झाली. या पाऊसामुळे संध्याकाळी सहा वाजल्यापासून अचानक विद्युत लाईट बंद झाली. विद्युत लाईट गेल्यापासून नागरिकांची एकच चर्चा सुरू झाली अशी की, लाईट कधी येईल ? अशी चर्चा ऐकण्यासाठी मिळत होती. परंतु येडशी पासुन अठरा किलोमीटर अंतरावर असलेले धाराशिव शहर आहे.
धाराशिव येथुन महावितरण विद्युत लाईट 33 केव्ही थ्री फेज विद्युत कनेक्शन आहे. या विद्युत कनेक्शन वर , अनेक गावांची विद्युत कनेक्शन आहेत. या थ्री फेज एक हि दिवस राहत नाही. थ्री फेज मुळे कधी सकाळी , कधी दुपारी , तर , कधी संध्याकाळी रात्री – अपरात्री 33 केव्ही लाईट बंद होते. या विद्युत लाईट मुळे अनेक येडशी ग्रामस्थांनाची डोकेदुखी ठरत आहे. आणि काल दि.19 सोमवार रोजी संध्याकाळी पाऊसामुळे येडशी गाव रात्रभर अंधाऱ्यात राहिला. गाव अंधाऱ्यात असताना ही महावितरणचे एकही वरिष्ठ अधिकारी फिरकुन बघितले नाही. या अगोदरही 33 केव्ही थ्री फेज विद्युत लाईट अनेक वेळेस समस्या येत आहेत.
या विद्युत लाईटकडे येडशी महावितरणचे सहाय्यक अभियंता व उपअभियंता आणि वरिष्ठ अधिकारी हातावर हात बांधून बसत आहेत. एकतर थ्री फेज विद्युत कनेक्शनवर जास्त असलेले गावे कमी करण्यात यावे नाही, तर नुतन केबल ची मागणी करून केबल जोडण्यात यावे, या कडे कोणीही फिरुन बघत नाही. नुकतेच नावालाच पगाराला भरती सुरू आहे. म्हणुनच म्हणायची वेळ येत आहे की, नागरिक त्रस्त, वरीष्ठ अधिकारी सुस्त, अशी भूमिका ऐकायला मिळत आहे. तरी या मुंबई च्या महावितरण ने येडशी महावितरण यांच्या कडे लवकरात – लवकर दखल घेऊन , या सर्वांची बदली करण्यात यावी. अशी मागणी ग्रामस्थांनातुन होत आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )