





सुरगाणा पंचायत समिती ” मेरी मिट्टी, मेरा देश अभियान “ आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत प्रारंभ !
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : बोरगाव प्रतिनिधी : लक्ष्मण बागुल
β⇒ बोरगाव , ता. १२ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :- सुरगाणा पंचायत समिती अंतर्गत ‘ मेरी मिट्टी मेरा देश अभियान ” आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला . यावेळी आमदार पवार यांनी सांगितले की, भारत हे राष्ट्र जगातील तरुणांचे राष्ट्र म्हणून ओळखले जाते. हा देश 2047 पर्यंत जगातील महासत्ता असेल यासाठी पंतप्रधान मोदींनी आपणास जे पंच प्रण सांगितले आहेत, ते आपण अंगिकारले पाहिजे, असे आवाहन केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या उपक्रमांतर्गत पंच प्रण शपथ घेण्यात आली. यात विकसित भारत, गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाका, आपल्या वारसाचा अभिमान बाळगा, एकतेचे सामर्थ्य घडवा, नागरिकांची कर्तव्य अंगिकारा, असे आवाहन तहसीलदार प्रशांत कुलकर्णी व प्रभारी गटविकास अधिकारी सुहास शिंदे यांनी केले. कार्यक्रमास आमदार नितीन पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित, सहायक गटविकास अधिकारी काशीनाथ गायकवाड, प्रकल्प कार्यालयाचे तुषार पाटील, सरपंच राजेंद्र गावित, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ, तालुक्यातील सर्व विभागाचे प्रमुख, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले , मो . ८२०८१८०५१०
