





श्री.तिर्थक्षेत्र रामलिंग देवस्थान श्रावण यात्रेला भाविक भक्तांना चव्हाण परिवारकडून साडे चारशे लिटर दुध वाटप

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 20 ऑगस्ट 2024
β⇔येडशी (शहर), दि.20 (प्रतिनिधी : सुभान शेख ):- ‘सोलापुर ते छत्रपती संभाजी नगर’ या महामार्गावर असलेले धाराशिव तालुक्यातील येडशी जवळ तीन किलोमीटर अंतरावर असलेले तिर्थक्षेत्र श्री.रामलिंग देवस्थानला मिनी महाबळेश्वर या स्वरूपात ओळखले जाणारे तिर्थक्षेत्र आहे. या श्री. तिर्थक्षेत्र रामलिंग देवस्थानात दरवर्षी प्रमाणे श्रावण महिन्यात एक महिनाभर यात्रा भरवली जाते. या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भाविक भक्त दर्शना साठी ये – जा करतात.

येडशी शहरातील स्थानिक नागरिक दगडु चव्हाण यांच्या परिवार वतीने काल दि.19 सोमवार रोजी सकाळी सात वाजल्यापासून श्री.तिर्थक्षेत्र रामलिंग देवस्थानला दर्शनासाठी येणाऱ्या – जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी पिण्यासाठी साडेचारशे लिटर दिवसभरात दूध वाटप करण्यात आले. सामाजिक सेवा म्हणून भक्तांना दुध वाटप केले त्यामुळे अनेक भाविक भक्तांनी गर्दी करुन या दुधाचा स्वाद घेत आनंद व्यक्त केला. दरम्यान दगडु चव्हाण मागील अनेक वर्षांपासून श्री.तिर्थक्षेत्र रामलिंग परिसरात येणाऱ्या – जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी पिण्यासाठी दुध वाटप करत असतात. या वेळी दुध वाटप करतांना दगडु चव्हाण , गणेश राजेंद्र नलावडे , दोन मुलींनी आदि इतर ग्रामस्थांनी सहभाग घेतला. दरम्यान या समाज सेवी भावनेतून भाविकांना दूध उपलब्ध करून दिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे,
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )