β : ताहाराबाद (नाशिक):⇔जळगाव येथील कार्यक्रमात”रोटरी क्लब ऑफ (सटाणा)”बागलाणला एकुण १८अवॉर्ड्स प्रदान-(प्रतिनिधी : डॉ. प्रसाद सोनवणे)
β : ताहाराबाद (नाशिक):⇔जळगाव येथील कार्यक्रमात"रोटरी क्लब ऑफ (सटाणा)"बागलाणला एकुण १८अवॉर्ड्स प्रदान-(प्रतिनिधी : डॉ. प्रसाद सोनवणे)
जळगाव येथील कार्यक्रमात “रोटरी क्लब ऑफ (सटाणा)” बागलाणला एकुण १८ अवॉर्ड्स प्रदान
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 12 ऑगस्ट 2024
β⇔ताहाराबाद (नाशिक), दि.12 (प्रतिनिधी : डॉ. प्रसाद सोनवणे ):- जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या सन २०२३-२४ च्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या अवॉर्ड कार्यक्रम अंतर्गत पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारात गडचिरोली, नागपूर पासुन ते इगतपुरी, सिन्नर, बागलाण, कळवण असे एकुण १०१ क्लब्स पैकी ‘रोटरी क्लब ऑफ सटाणा’ बागलाणला एकुण १८ अवॉर्ड्स मिळाले. त्यात ४ रनर अप सोडुन सर्व प्रथम अवॉर्ड्स व क्लबला सायटेशन अवॉर्डसह अल्फा कॅटेगरीतील “बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड ही प्रेसिडेंट” हा पुरस्कार डॉ. प्रसाद सोनवणे यांना प्रदान करण्यात आला .
यावेळी पीडीजी. आशा वेणूगोपाल, डीजी. राजींदर खुराणा, पीडीजी रमेश मेहेर, पीडीजि किशोर केडिया, पीडीजी महेश मोकलकर,पीडीजी डॉ. आनंद झुंजझुंवाला, पीडीजी राजेंद्र भामरे, डीजी एनडी नाना शेवाळे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ सटाणा हा नाशिक जिल्ह्यासह कसमादे तुन १८ मानंकाने मिळविणारा एकमेव क्लब झाला आहे. त्यांचे सर्व रोटरी पदाधिकारी व सर्वत्र अभिनंदन होतं आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )