β : बाऱ्हे (सुरगाणा ):⇔ बुबळी फाटा येथे डीवायएफआयचे प्रलंबित मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन – (प्रतिनिधी : दिपक देशमुख
β : बाऱ्हे (सुरगाणा ):⇔ बुबळी फाटा येथे डीवायएफआयचे प्रलंबित मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन - (प्रतिनिधी : दिपक देशमुख
बुबळी फाटा येथे डीवायएफआयचे प्रलंबित मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन
“लोकप्रतिनिधी, अधिकारी व ठेकेदार यांच्या दुर्लक्षपणामुळे विकासकामे रखडली” – माजी आमदार जे. पी.गावित
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :शनिवार : दि 30 डिसेंबर 2023
β⇔बाऱ्हे (सुरगाणा ) ता. 30 (प्रतिनिधी : दिपक देशमुख ) :- सुरगाणा तालुक्यातील विविध प्रलंबित विकासकामे त्वरित करण्यात यावीत . यासाठी डीवायएफआयचे (भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ) तर्फे सुरगाणा तालुक्यातील लाडगाव ( बुबळी) फाटा येथे दोन दिवसापासून जनआक्रोश आंदोलन रास्ता रोको करण्यात आला. सुरगाणा तालुक्यातील रखडलेली विकासकामे ‘ बोरगाव ते बर्डीपाडा , सुरगाणा – मधला तळपाडा -आहवा , लाडगाव – श्रीभुवन , सुरगाणा – बाऱ्हें, सुरगाणा -पळसण हे दळणवळणाचे महत्वाचे रस्ते, शासकीय इमारती, शासकीय आश्रम शाळेच्या इमारती, पूल, मोऱ्या, पाझर तलाव, धरण शिमेंट काँकरिट बंधारे, जलजीवन पाईपलाईन आदि विकास कामे लोकप्रतिनिधी, अधिकारी व ठेकेदार यांच्या दुर्लक्षपणामुळे रखडलेली आहेत. सदर सर्व विभागतील विकास कामे त्वरित सुरु करून मार्गी लावण्यात यावी म्हणून डीवायएफआयचे राज्य उपाध्यक्ष इंद्रजीत गावित , तालुक्ता अध्यक्ष अशोक भोये यांच्या नेतृत्वाखाली लाडगाव बुबळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी माजी आमदार जे.पी. गावित यांनी रास्ता रोको आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली.
त्यावेळी माजी आमदार जे.पी. गावित यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करत तालुक्यात मोठ्या प्रमाणात घोटाळे सुरु असून कामाचे उदघाट्न करून दोन – तीन वर्ष झाले असतांना अदयाप कामे झालेली नाहीत. रस्त्याच्या दुरुस्ती करण्यासाठी दोन – तीन कोटी रुपये खर्च झाले आहेत.मात्र अद्याप रस्ते दुरुस्त झाले नसुन रस्ते बनवण्याचे नियम न पाळता अतिशय नित्कृष्ठ दर्जाचे कामे चालू आहेत. आम्हाला कोणी काही बोलणार नाही, असे समजून ठेकेदार व कर्मचारी जनतेच्या पैशाची लूटमार करत आहेत.ग्रामिण रुग्णालय सुरगाणा येथील रुग्णालयाची अंत्यन्त बिकट परिस्थिती आहे. तसेच सुरगाण्यातील सर्व आरोग्य केंद्र व कर्मचारी व सुविधांची अचानकपणे जाऊन त्यांच्या कामाची पाहणी करावी.यासाठी बांधकाम विभाग,जिल्हापरिषद व महावितरण, वनविभाग व इतर विभागाच्या सर्व संबंधित अधिकार्यांना त्यांच्या विभागात चालू असलेली कामे व तालुक्यात चालू असलेली जलजीवनची व रस्त्याचे कामे त्वरित मार्गी लावावीत अशा सूचना तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या.सर्व अधिकाऱ्यांनी एक ते दोन महिण्यात सर्व कामे मार्गी लावू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर लोकशाहीवादि युवा महासंघाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन तूर्तास स्थगित केले.यावेळी सबंधित विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते.डीवायएफआयचे राज्य उपाध्यक्ष इंद्रजीत गावित , तालुक्ता अध्यक्ष अशोक भोये , हिरामण वाघमारे , मोहन पवार , हिमंत गायकवाड , कैलास भोये , हेमंत भुसारे , संजीवनी चौधरी, सुशीला गायकवाड , वनिता गवळी , भारती बागुल ,रमेश वाघमारे , कान्हा हिरे आदीसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते .
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज:मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो ८२०८१८०५१०