β : त्र्यंबकेश्वर : ⇔ त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळांतर्गत डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला उद्घाटन संपन्न – ( प्रतिनिधी : प्रा. समाधान गांगुर्डे )
β : त्र्यंबकेश्वर : ⇔ त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळांतर्गत डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला उद्घाटन संपन्न - ( प्रतिनिधी : प्रा. समाधान गांगुर्डे )
त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळांतर्गत डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला उद्घाटन संपन्न
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : :नाशिक : शनिवार : दि. 28 ऑक्टोबर 2023
β⇔ त्र्यंबकेश्वर , ता 28 ( प्रतिनिधी : प्रा. समाधान गांगुर्डे ) : – मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,त्र्यंबकेश्वर येथे बहि:शाल शिक्षण मंडळ अंतर्गत डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे उदघाट्न मविप्र समाज नाशिक ग्रामीणचे संचालक – रमेशआबा पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी “त्र्यंबकेश्वर हे उद्योजक घडविणारे शहर आहे. विद्यार्थ्यांनी त्र्यंबकेश्वरकडे फक्त पर्यटन स्थळच नव्हे, तर उद्योगाच्या दृष्टीने देखील बघावे. कल्पकता आणि कुशलतेच्या जोरावर लघुउद्योगाला भरपूर संधी उपलब्ध असल्याने त्याचा फायदा घ्यावा.”असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲड. मयूर जाधव यांनी ‘नोकरी सोडा आणि उद्योजक व्हा ‘या विषयावर पहिले पुष्प गुंफताना “आपण सर्व सध्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत.या युगात उद्योजक होणे सोपे आहे. त्यासाठी आपणाकडे समाजाची गरज भागविणारी कल्पना व त्याला तंत्रज्ञानाची जोड असणे गरजेचे आहे. कुठल्याही उद्योगाला खंबीर नेतृत्वाची गरज असते.धाडस व उद्योजकता या नाण्याच्या दोन बाजू आहे . त्र्यंबकनगरी ही उद्योजक नगरी म्हणून नावारूपाला येण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहावे.” अशी आशा व्यक्त केली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांनी अध्यक्षीय भाषणात ” कुटुंबाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी उद्योजकता हा उत्तम पर्याय आहे.प्राप्त ज्ञानाची उद्योगाशी सांगड घातल्यास अर्थार्जनाच्या व उत्कर्षाच्या वाटा खुल्या होतात. हेच कर्तृत्त्व व्यक्तीला समाजात ओळख,आदर आणि शक्ती बहाल करते. उद्योजक बनू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी छोट्या -मोठ्या उद्योजकांच्या जीवनगाथा वा चरित्रे वाचणे गरजेचे आहे. ज्यातून त्यांची जडणघडण,संघर्ष, अडचणीतून काढलेले मार्ग याचे ज्ञान होते आणि मार्ग सापडतो.म्हणून विद्यार्थ्यांनी शाश्वत नोकरीचे स्वप्न सोडून उद्योजकतेकडे वळावे.”असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते फशाबाई लचके ,गायत्री जाचक (हँडबॉल खेळाडू),गणेश तारगे (धावपटू), प्रा . मनोहर जोपळे यांचा सत्कार करण्यात आला.केंद्र कार्यवाह डॉ.मनिषा पाटील यांनी प्रास्ताविकात बहि:शाल शिक्षण मंडळाचा इतिहास व उद्देश स्पष्ट केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शरद कांबळे, सत्र प्रमुख डॉ. राजेश झनकर, कनिष्ठ महाविद्यालय सत्रप्रमुख श्रीमती विद्या जाधव,सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.निता पुणतांबेकर, पाहुण्यांचा परिचय प्रा.अर्चना धारराव व आभारप्रदर्शन प्रा.राजश्री शिंदे यांनी केले.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ .भागवत महाले : मो ८२०८१८०५१०