आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
β : त्र्यंबकेश्वर (नाशिक):⇔त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात तीन दिवसीय इंडक्शन कार्यक्रम संपन्न-(प्रतिनिधी : प्रा.समाधान गांगुर्डे)
β : त्र्यंबकेश्वर (नाशिक):⇔त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात तीन दिवसीय इंडक्शन कार्यक्रम संपन्न-(प्रतिनिधी : प्रा.समाधान गांगुर्डे)
0
1
2
3
6
7
त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात तीन दिवसीय इंडक्शन कार्यक्रम संपन्न
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि. 3 जून 2024
β⇔ त्र्यंबकेश्वर (नाशिक ) दि.3 ( प्रतिनिधी : प्रा. समाधान गांगुर्डे):- येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 01 ऑगस्ट ते 03 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमांतर्गत सर्व प्राध्यापकांनी आपल्या विभागाची व विभागाअंतर्गत होणाऱ्या विविध उपक्रम व विद्यार्थ्यांसाठी त्याची उपयोगीता याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयातील विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली.
सदर इंडक्शन कार्यक्रमा अंतर्गत नवीन शैक्षणिक धोरण 2020, विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र, कॉलेजमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा, इमारत, तसेच राष्ट्रीय सेवा योजना ,विद्यार्थी विकास मंडळ, क्रीडा विभाग, वाचनालय, सांस्कृतिक विभाग, विविध शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, शैक्षणिक सहली, अभ्यास सहली, व्यक्तिमत्व विकास, नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत श्रेयांक पद्धत क्रेडिट सिस्टीम, महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्ष (IQAC), महाविद्यालयाचे प्रशासकीय माहिती, इत्यादी विषय सविस्तर माहिती या तीन दिवसीय इंडक्शन प्रोग्राम मध्ये देण्यात आली.
दरम्यान तीन दिवसीय कार्यक्रमा प्रसंगी सकाळ सत्र प्रमुख डॉ. राजेश झनकर, डॉ. संदीप निकम, IQAC समन्वयक डॉ. विठ्ठल सोनवणे, प्रा. चित्रलेखा जोंधळे, प्रा. समाधान गांगुर्डे, डॉ. भागवत महाले, प्रा. मनोहर जोपळे, डॉ. दिनेश उकिरडे, डॉ.वर्षा जुन्नरे, प्रा. उत्तम सांगळे, डॉ. अजित नगरकर, प्रा. किरण शिंदे, प्रा. संदीप गोसावी, डॉ. प्रशांत रणसुरे, डॉ. सुलक्षणा कोळी, प्रा. शाश्वती निरभवणे, प्रा. वैशाली जाधव, प्रा. विष्णू दिघे, प्रा. शरद उगले, श्री. लक्ष्मण ठमके व इतर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षच्या अंतर्गत (IQAC) करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)
©सदर लेखाबाबत संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. सदर मत सर्वस्वी लेखकाचे असून त्यांचीच जबाबदारी आहे,
0
1
2
3
6
7