





मद्दधुंद समाज कल्याण विभाग अधीक्षक कारचालकाची तीन वाहनांना धडक, सुदैवाने जीवितहानी नाही

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 24 ऑगस्ट 2024
β⇔नाशिक, दि.24 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):-मद्यधुंद कारचालकाने भरधाव चारचाकी चालवत रस्त्यावर बाजूला उभ्या असलेल्या तीन वाहंनाना जोरदार धडक दिली. राज्यभरात गेल्या काही दिवसापासून हिट अँड रन्सच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच नाशिकमध्ये हिट अँड रन्सचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे. एका मध्यधुंद समाज कल्याण विभागाच्या अधीक्षकाने दोन चारचाकी आणि दुचाकीला उडवून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली असून नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार 23 ऑगस्ट 2024 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान समाज कल्याण विभागाचे अधीक्षक विजय भगवान चव्हाण (५६,रा.अशोका मार्ग) हे त्यांची कार दारूच्या नशेत चालवत होते. पौर्णिमा बस स्टॅन्ड परिसरातील गणपती हॉटेल जवळ उभा असलेल्या गाड्यांवर त्यांनी धडक दिली. या तीन गाड्यांचे नुकसान झाले. त्यामुळे विजय चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )