प्रा. साहेबराव बोरस्ते यांना या वर्षीचा ‘फॅकल्टी ऑफ द इयर’ अवॉर्ड प्रदान !

कु. श्वेता सांगळे व शिक्षकेतर धीरज राजगिरे यांना पुरस्कार
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 20 फेब्रुवारी 2024
β⇔नाशिकरोड,दि.20(प्रतिनिधी:छाया लोखंडे-गिरी):-येथील गोखले एजुकेशन सोसायटीच्या सर डॉ.मो.स.गोसावी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय व संशोधन केंद्र या महाविद्यालयातील ‘फार्मासुटीक्स’ विभागातील प्रा.साहेबराव बोरस्ते यांना ह्या वर्गीचा ‘फैकल्टी ऑफ द इयर’ अवॉर्ड नुकताच प्राप्त झाला आहे. मागील २०२२-२३ ह्या शैक्षणिक वर्षात त्यांनी केलेल्या अतिशय उत्कृष्ट ”शैक्षणिक कार्याबाबत त्यांना सदर पुरस्कार “स्पेक्ट्रम- २०२४” ह्या १२व्या वार्षिक स्नेहसंमेलनात कमला ग्रुप ऑफ कंपनीज, पालघर, मुंबई येथील चेअरमन डॉ. दिगंबर झंवर सर व डॉ. प्रणिता गुजराथी मॅडम (फॅमिली फिजिसिअन, गंगापुर रोड) ह्याच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. पदविका विभागातून प्रा. श्वेता सांगळे व शिक्षकेतर विभागातून धीरज राजगिरे (प्रयोगशाळा परिचर-फार्मासुटीक्स विभाग) यांनाही यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रा. बोरस्ते हे गोखले फार्मसी महाविद्यालयातील सर्वात पहिले शिक्षक कर्मचारी (Founder faculty) असून सध्या ते सहाय्यक प्राध्यापक ह्या पदावर कार्यरत आहेत. त्यानीं विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये पेपर प्रकाशित केले असून आपल्या विषयाशी निगडित आंतराष्ट्रीय परिषदेकरिता त्यांनी परदेशात देखील दौरे केले आहेत. सध्या ०६ विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनात एम. फार्म. करत आहेत. प्रा. बोरस्ते हे ‘कोर ऍनॅलिटीकल लॅबोरेटरी’ नाशिक चे जॉईंट डायरेक्टर आहेत. ह्या सर्वाच्या उल्लेखनीय कार्याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील अमृतकार यांनी त्यांचे कौतुक केले आहे. उपप्राचार्य डॉ. प्रशांत पिंगळे व इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510