β : देवळा :⇒ श्रीक्षेत्र कनकापूर हरिनाम सप्ताह, ४ सप्टेंबरपासून सुरु प्रवचन व कीर्तन होणार – ( प्रतिनिधी : भगवान शिंदे )
β : देवळा :⇒ श्रीक्षेत्र कनकापूर हरिनाम सप्ताह, ४ सप्टेंबरपासून सुरु प्रवचन व कीर्तन होणार - ( प्रतिनिधी : भगवान शिंदे )
श्रीक्षेत्र कनकापूर हरिनाम सप्ताह, ४ सप्टेंबरपासून सुरु प्रवचन व कीर्तन होणार
β ⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : नाशिक , मंगळवार , दि २९ ऑगस्ट २०२३
श्रीक्षेत्र कनकापूर ( देवळा) :- ता २९ ( प्रतिनिधी : भगवान शिंदे ) सर्व तमाम भाविक बंधू भगिनींना कळविण्यात आनंद होत आहे, की श्रीक्षेत्र कनकापूर येथे सालाबादप्रमाणे अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री. पांडुरंगाच्या कृपेने ह भ प ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज खेडगावकर व ह भ प ब्रह्मविलीन वामनांद महाराज खर्डे , वैकुंठवासी ह भ प ज्ञानेश्वर माऊली शेळके यांच्या आशीर्वादाने व ह भ प नाना महाराज तिळवणकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने हरिनाम सप्ताह सुरू होत आहे ,तरी या सप्ताहात ७ दिवस विविध नामवंतांचे प्रवचन व कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहेत.
दिनांक 4 /9 /2023 रोजी केवळ महाराज यांचे प्रवचन व भरत महाराज यांचे कीर्तन दिनांक 5/ 9/ 2023 भाऊसाहेब महाराज यांचे प्रवचन व नंदू महाराज यांचे कीर्तन 6/9/2023 रवींद्र महाराज यांचे प्रवचन व केशव महाराज घोटी यांचे कीर्तन 7/ 9/ 2023 प्रा. भगवान महाराज शिंदे यांचे प्रवचन व तात्या महाराज यांचे कीर्तन 8/9/ 2023 प्रकाश महाराजांचे प्रवचन व पुंडलिक महाराज खर्डे यांचे कीर्तन 9/09/2023 मुकेश महाराजांचे प्रवचन व समाधान महाराज यांचे कीर्तन 10/09/2023 काशिनाथ महाराज यांचे प्रवचन व संजय नाना धोंडगे यांचे कीर्तन व 11/ 9/ 2023 रोजी ह भ प नाना महाराज तिळवणकर यांचे काल्याच्या कीर्तनाने सांगता होईल, या सप्ताहात सात दिवस अनेक नामवंत गायक व वादक उपस्थित राहणार आहेत, तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ,असे आव्हान कनकापूर ग्रामस्थांनी व भजनी मंडळ यांनी केले आहे.
दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ .भागवत महाले, मो . ८२०८१८०५१०